Sharad Pawar | ‘बदलापूर मध्ये कोणता राजकीय पक्ष होता?’; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

0
20
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar : बदलापुरात 13 ऑगस्ट रोजी 4 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले. त्यानंतर संतप्त नागरिकांकडून प्रशासनाच्या ढोबळ कारभाराविरोधात प्रतिकार करणारं आंदोलन केलं गेलं. ज्याचा उद्देश केवळ आणि केवळ आरोपीला शिक्षा व्हावी व पिडीतांना न्याय मिळावा इतकाच होता. मात्र या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय हेतूने घडवून आणलेले आंदोलन असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या आरोपाला खोडून काढत शरद पवार यांनी आता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याचबरोबर महाराष्ट्र बंदच्या घोषणे संबंधित आपली भूमिका स्पष्ट केली.

Maharashtra Bandha | विरोधी पक्षांकडून बंदची हाक; उद्या राज्यात काय बंद काय सुरू असणार..?

नेमकं काय म्हणाले शरद पवार

“विद्येच्या घरात दोन अजाण मुलींवर अत्याचार केले गेले. त्यामुळे राज्यभरात नागरिकांच्या संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी बदलापूर मध्ये केलेले आंदोलन ही त्यांच्या संतापातून उमटलेली एक प्रतिक्रिया होती. सरकारने अशा परिस्थितीसाठी नेहमी सज्ज असले पाहिजे.”

“राज्यभरात स्त्रियांवर, लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बदलापूर सारखी घटना घडते तेव्हा राज्याच्या गृह खात्याने कठोर निर्णय घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. मागील तीन-चार दिवसांमध्ये बदलापूर सारख्या अनेक घटना समोर येत असून यावेळी जे काही बोलले जात आहे ते फक्त बदलापूर पुरता मर्यादित राहत नाही. नागरिकांमध्ये या संपूर्ण परिस्थितीमुळे रोष पाहायला मिळत असल्यामुळे या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून शनिवार 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. संतप्त समाजाची भावना सरकारपर्यंत पोहोचावी एवढाच या बंद मागे उद्देश आहे. असे शरद पवारांनी सांगितले.

Nashik News | नाशकात काँग्रेसचा भव्य मेळावा; पण मेळाव्यात एकुलत्या एक आमदारालाच स्थान नाही..?

“मुख्यमंत्र्यांचं ते म्हणनं चुकिचं” – शरद पवार

बदलापूरमध्ये झालेलं आंदोलन हे घडलेल्या प्रकाराबद्दल नागरिकांच्या मनात असलेल्या संतापातून केलं गेलं. त्यामुळे या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी राजकीय हेतूने केलेला आंदोलन म्हणणे चुकीचे आहे. ‘तिथे कुठला राजाकीय पक्ष होता?’असा सवाल यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला. इथे प्रश्न आपल्या भावना व्यक्त करण्याचा होता. इतक्या संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करावे असे आमच्या मनातही नव्हते. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे त्या दृष्टिकोनातून पाहू नये अशी विनंती करत मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले.

उद्याचा बंद शांततेच्या चौकटीत पार पाडावा- शरद पवार 

महाविकास आघाडीकडून राज्यात सुरू असलेल्या स्त्रियांवरील अत्याचारांविरोधात नागरिकांमध्ये असलेला रोष व्यक्त करण्यासाठी, त्याचबरोबर अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई होईल असे निर्णय घेतले जावेत यासाठी जनमत तयार करता यावे या उद्देशाने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीतील सर्व सहकारी सहभागी होणार आहेत. अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी समाजाला जागृत करणे आवश्यक आहे. अशा घटना थांबवण्यासाठी जे काही करता येईल ते शांततेच्या चौकटीत राहून नक्कीच केले पाहिजे. असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी नागरिकांना केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here