Sharad Pawar | शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार..?; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

0
81
Vidhansabha Election
Vidhansabha Election

Sharad Pawar |  सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धूम सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप, हेवे-दावे सुरू आहेत. काल देशात तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. मात्र, यापूर्वीच सततच्या दगदगीमुळे शरद पवारांची प्रकृती खालवलयाची माहिती समोर आली होती. यामुळे त्यांचे सगळे नियोजित दौरेही रद्द करण्यात आले होते. मात्र, एक दिवसांची विश्रांती घेऊन ते पुन्हा मैदानात उतरले असून, बारामतीनंतर आता त्यांनी शिरूर लोकसभेकडे मोर्चा वळवला आहे. (Sharad Pawar)

यातच आता त्यांच्या एका व्यक्तव्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात काही फरक नाही. वैचारिकदृष्ट्या देखील आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारानेच चालत आहोत. यामुळे आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा शरद पवार यांनी केला असून, यामुळे आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar)

तसेच उद्धव ठाकरे हेदेखील आपल्याच विचारधारेचे आहेत. ते देखील समविचारी आहेत. असेही एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का..? या चर्चांना उधाण आले आहे. (Sharad Pawar)

Sharad Pawar | शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले असून, शरद पवार यांनी आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक दावे केले आहेत. यानुसार या लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा शरद पवार यांनी यावेळी केला.

Sharad Pawar | आधी इन्कार आणि आता होकार..?

यापूर्वीही राष्ट्रवादी शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी याबाबत नकार दिला होता. मात्र, आता शरद पवार यांनी स्वतः दावा केल्याने या चर्चा पुन्हा सुरू झाल्या असून, यावर जवळपास शिक्कामोर्तबच झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पुढील काही महिन्यांत अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेससोबत जवळीक साधतील किंवा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा देखील पर्याय असेल.

Sharad Pawar | शरद पवारांनी नगर जिल्ह्याचे सर्वात जास्त वाटोळं केलं..?

आम्ही काँग्रेसच्या जवळच आहोत

दरम्यान, या मुलाखतीत शरद पवारांना हा पर्याय राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्यावेळी त्यांनी स्पष्टच सांगितले की, “काँग्रेस पक्ष व आमच्यात मला फार काही फरक दिसत नाही. आमच्या दोन्ही पक्षांची विचारसरणी ही गांधी व नेहरू यांच्याच विचारांची असून, यावर मी माझ्या सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काहीही बोलणार नाही. मात्र, वैचारिकदृष्ट्या बघितले तर, आम्ही काँग्रेसच्या जवळच आहोत. परंतु नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे जरा कठीण आहे.(Sharad Pawar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here