Shantigiri Maharaj | मतदान केंद्रावर महाराजांच्या चिठ्ठ्या वाटल्या; सहकारी पोलिसांच्या ताब्यात

0
81
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj

Shantigiri Maharaj |  सुरुवातीपासूनच चर्चेत असलेला नाशिक लोकसभा मतदार संघ हा आज मतदानाच्या दिवशीही चर्चेत आहे. आज सकाळीच शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj)  मतदान केल्यानंतर ईव्हीएमला हार घातला आणि मतदान केंद्राबाहेर पूजा केली. यामुळे आधीच त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असतानाच आता त्यांच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) आज अखेरच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. येथे तिरंगी लढत होत आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) या तिन्ही उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

Shantigiri Maharaj | ईव्हीएमला घातला हार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता..?

दरम्यान, ईव्हीएमला (EVM) हार घातल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर (Shantigiri Maharaj)  आचारसंहिता उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, यानुसार शांतीगिरी महाराजांच्या एका सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Shantigiri Maharaj | नेमकं प्रकरण काय..?

शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हा सहकारी मतदान केंद्राबाहेर शांतीगिरी महाराजांच्या चिठ्ठ्या वाटत असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी जनेश्वर महाराज यांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास म्हसरूळ पोलिस करत आहे. (Shantigiri Maharaj)

Shantigiri Maharaj | भाजपचा शांतीगिरी महाराजांना पाठिंबा..?; महाराजांचा मोठा गौप्यस्फोट


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here