Shantigiri Maharaj | भाजपचा शांतीगिरी महाराजांना पाठिंबा..?; महाराजांचा मोठा गौप्यस्फोट

0
40
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj

Shantigiri Maharaj |  सुरुवातीपासूनच नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency) हा चर्चेत होता. येथे महायुतीचे हेमंत गोडसे, मविआचे राजाभाऊ वाजे, आणि शांतिगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. २० मे रोजी मतदान होणार असून, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

दरम्यान, महायुती आणि मविआने पक्षाच्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले असून, प्रचारात आपणही कुठे मागे राहू नये म्हणून अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनीही कंबर कसली आहे. इकडे दिग्गज नेत्यांच्या सभा होत असताना शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) मतदार संघ पिंजून काढत होते आणि प्रचारासाठी रोज नवनवीन फंडे आजमावत होते. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही त्यांनी भव्य पदयात्रा काढली असून, नाशिकच्या गंगा घाटावरून त्यांच्या रॅलीला सुरुवात केली. मध्यमांशी संवाद साधताना यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे.

Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराजांनी गुन्हा लपवला..?; उमेदवारीचे भवितव्य धोक्यात

भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांचा पाठींबा 

यावेळी मध्यमांशी संवाद साधताना शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) सांगितले की, “ही आमची शोभा यात्रा असून, हे कुठलेही शक्ती प्रदर्शन नाही. ह्या समाजाचे आमच्यावर प्रेम आहे. तसेच भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचाही आम्हाला पाठींबा आहे. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे, यंदा फक्त लढायचे आणि जिंकायचे. निश्चितच आमच्या बादलीचा विजय होणार असल्याचा मोठा दावा यावेळी शांतीगिरी महाराजांनी केला.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे असताना भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याच्या शांतीगिरी महाराजांच्या या दाव्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटना या आपल्यासोबत असल्याचे शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) सांगितले आणि चर्चांना उधाण आले आहे.

Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराजांच्या माघारीसाठी महायुतीचे जोरदार प्रयत्न

Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराजांचे प्रचाराचे फंडे

शांतीगिरी महाराजांचे त्र्यंबक येथील अनुष्ठान, उमेदवारी अर्ज दाखल करतानाचे शक्ति प्रदर्शन, त्यानंतर जॉगिंग ट्रॅकवर व्यायाम करत केलेला प्रचार, सायकलवरून प्रवास करत प्रचार, आणि आज शेवटच्या दिवशी आयोजित ही ११ किलोमीटरची भव्य पदयात्रा, असे एकूणच प्रचाराचे महाराजांचे फंडे असून, एखाद्या मुरब्बी राजकारण्याप्रमाणे ते प्राचराची कामे करताना दिसत आहेत. मात्र, शांतीगिरी महाराजांच्या (Shantigiri Maharaj) उमेदवारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगत वाढल्याचे चित्र स्पष्ट आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here