Shantigiri Maharaj | लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. तसेच इच्छुक उमेदवारही आपापल्या सोयीप्रमाणे पक्ष शोधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशिक दौऱ्यानंतर राजकीय दृष्ट्या नाशिकचे महत्त्व हे वाढले असून, नाशिकमधून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत. नाशिकमधून लोकसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
दरम्यान, आता वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांचा देखील या इच्छुक उमेदवारांच्या यादीत समावेश झाला आहे. शांतिगिरी महाराज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. जयबाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख तसेच वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज हे नाशिक जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्हयातही मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. दरम्यान, शांतिगिरी महाराज हे आता नशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. याआधीही त्यांनी निवडणूक लढवली आहे.
Shantigiri Maharaj | २००९ सालीही निवडणूक लढवली होती
महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी याआधी सन २००९ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लोकसभेची अपक्ष निवडणूक लढविली होती. यावेळी शांतीगिरी महाराज हे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मोठे आव्हान ठरले होते. ते मतांच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर शांतीगिरी महाराज हे राज्याच्या सक्रिय राजकारणापासून दूर राहिले आणि ते पुन्हा अध्यात्माच्या मार्गाकडे वळाले. (Shantigiri Maharaj)
Loksabha 2024 | लोकसभेचा बिगुल वाजला; संभाव्य तारखा जाहीर..!
नाशिकच का..?
जय बाबाजी भक्त परिवारामुळे स्वामी शांतीगिरीजी महाराजांचा छत्रपती संभाजीनगर नंतर नाशिकमध्ये मोठा भक्त परिवार आहे. त्यांच्या भक्तांची संख्याही मोठी आहे. नुकतेच नाशिकच्या तपोवन येथे शांतिगीरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे धार्मिक अनुष्ठान झाले. यावेळी मोठ्या संख्येने जय बाबाजी भक्तपरिवार या अनुष्ठानासाठी उपस्थित होते. केवळ सामान्य नागरिकच नाहीतर काही बडे नेते मंडळी महाराजांचे भक्त आहेत. दरम्यान, एकंदरीत नाशिक जिल्ह्यात बाबांचा मोठा भक्तपरिवार असून, तसेच त्यांचे मूळ गावदेखील नाशिक जिल्ह्यातीलच असल्याने त्यांचा नाशिकमध्ये दांडगा जनसंपर्क आहे आणि याचा त्यांना राजकीय दृष्ट्या चांगला फायदा होऊ शकतो.
पंतप्रधान मोदी-शांतिगिरी महाराज
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शांतिगिरी महाराजांचा एक कथित फोटो हा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नाशिक दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर ते स्वामी शांतीगिरी महाराजांना भेटले होते. दरम्यान, या फोटोत आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा. असा संदेश पंतप्रधान मोदी देत असल्याचा उल्लेख या फोटोच्या कॅप्शनमध्ये करण्यात आल्यामुळे या चर्चांना मोठे उधाण आले आहे.(Shantigiri Maharaj)
Nashik Loksabha | मराठ्यांना नडल्याचे परिणाम; अजित दादांनीच भुजबळांना दूर लोटले
आज महाराज काय बोलणार..?
दरम्यान, या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात आह शांतिगिरी महाराज हे आज त्यांची भूमिका मांडणार आहे. यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचेही आयोजन केलेले आहे. आगामी लोकसभा निवडणुका बाबा लढवणार का? याबाबत महाराज आज त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. आजच्या पत्रकार परिषदेत शांतीगिरी महाराज काय बोलणार? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोण आहेत शांतीगिरी महाराज?
जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी म्हणजेच स्वामी शांतीगिरी महाराज. या शांतीगिरी महाराजांचा राज्यात लाखोंच्या संख्येने भक्त परिवार असून, स्रवत जास्त संख्या ही छत्रपती संभाजी नगर आणि नशिक जिल्ह्यातच आहे. भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून ते धार्मिक कार्य करतात. महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभरात त्यांचे एकूण ११५ आश्रम आहेत तर, ७ गुरुकुल देखील आहेत. धार्मिक अनुष्ठानांच्या माध्यमातून त्यांनी राज्यात व्यसनमुक्तीचे मोठे कार्य उभारले आहे. त्यांना मौनीगिरी महाराज म्हणूनही भक्त ओळखतात. कारण त्यांनी तब्बल १२ वर्षे मौन पाळले होते.(Shantigiri Maharaj)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम