Seema Hiray | नाशिक नगरी ही धार्मिक नगरी तसेच पुण्यनगरी म्हणून ओळखली जाते. प्रभु श्री रामचंद्रांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या ह्या नाशिकपुण्य नगरीत देश विदेशातून मोठ्या प्रमाणात जणसमुदाय हा येथे सिंहस्थ कुंभमेळयासाठी येत असतो. यावेळी नाशिकमध्ये लाखो साधुसंत तर, करोडोंच्या संख्येने भाविक हे दुरदुरहून नाशिकमध्ये हा १२ वर्षातून एकदा भरणार ‘सिंहस्थ कुंभमेळा’ बघण्यासाठी येतात.
सिंहस्थ हा नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राची शान असून, आतापासूनच सिंहस्थाच्या तयारीला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. पण, नाशिकचे महापालिका प्राशसन हे ह्या कामी उदासीन असल्याचे गंभीर आरोप नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत केले होते.
२०२७-२८ यावर्षात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळयासाठी राज्य सरकारकडून कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याने नाशिक महानगर पालिका प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात ११ हजार कोटी रुपयांचा सिंहस्थ कुंभमेळयासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून, दुसरीकडे नाशिक महापालिका ही सिंहस्थासाठी उदासीन असून, काहीच पाऊले उचलत नसल्याचा आरोप नाशिक शहरातील आ. सीमा हिरे (Seema Hiray) यांनी केला आहे.
Sudhakar Badgujar | बडगुजर यांच्या विरोधात नाशिक शिवसेनेतर्फे जोडे मारो
सरकारला सिंहस्थाच विसर | (Seema Hiray)
२०२७-२८ यावर्षी सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकमध्ये पार पडणार असून, त्याचे नियोजन हे आतापासूनच सुरू व्हायला हवे. मात्र, राज्य सरकारला सिंहस्थाच्या तयारीचा विसर पडला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने आपल्या पातळीवर त्याची तयारी सुरू केली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती ही स्थापन करण्यात केलेली होती.
दरम्यान, आता पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त डॉ. अशोक कंरजकर यांनी प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार सिंहस्थ समन्वय अधिकारी तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने ११ हजार १२७ कोटींचा सिंहस्थासाठीचा प्रारूप आराखडा तयार केला आहे.(Seema Hiray)
Nashik Kumbhamela | विद्यमान पालकमंत्र्यांना डावलून माजी पालकमंत्र्यांना अध्यक्षपदाचा मान
आ. हिरेंवर अधिकारी नाराज
दरम्यान, आता राज्य सरकारने सिंहस्थाच्या तयारीसाठी निर्णय घेण्यासाठी आमदारांकडून शासन दरबारी लॉबिंग करणे अपेक्षित असताना आमदार सीमा हिरे यांनी हा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित केल्यामुळे नाशिक महानगर पालिकेतील अधिकारी नाराज झाले आहेत. दरम्यान, आराखड्यातील याद्या प्रमाणित करण्याच्या सूचना ह्या सिंहस्थ समन्वय अधिकारी तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम