नाशिक : येथील मविप्र संचालित मराठा हायस्कूलची विद्यार्थीनी सृष्टी महाले हिने अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक मिळविला असून जिल्हास्तरावरील विज्ञान मेळाव्यासाठी ती पात्र ठरली आहे.
शहरातील वाय.डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज येथे नुकतेच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात सृष्टीने शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान, आव्हाने व शक्यता याविषयी आपले मनोगत व्यक्त करून तालुक्यातील एकूण २५ विद्यालयातील स्पर्धकांपैकी तिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकवत यश मिळवले. त्याचसोबत जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी तिची निवड झाली आहे. सृष्टीला विज्ञानशिक्षक वीणा काळे, संगिता जाधव, सुवर्णा मुठाळ, हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे यांच्याहस्ते यावेळी सृष्टीचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व इतर पदाधिकारी, शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. भास्कर ढोके, शालेय समितीचे सदस्य, उपमुख्याध्यापक संजय डेर्ले, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सृष्टीचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम