Science Exhibition | धामणगाव येथे ’47’वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

0
48
Science Exhibition
Science Exhibition

Science Exhibition | राम शिंदे : इगतपुरी – पंचायत समिती शिक्षण विभाग आणि तालुका विज्ञान अध्यापक संघ इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 47 वे इगतपुरी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा धामणगाव व माध्यमिक विद्यालय धामणगाव येथे होणार आहे.

या विज्ञान प्रदर्शनात इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेज अशा चार ते पाच गटांमध्ये विद्यार्थ्यांना आपले पेटंट उपकरणे मांडण्यासाठी संधी मिळणार असून इगतपुरी तालुक्यातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा असे आवाहन इगतपुरी तालुका शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

CM Eknath Shinde | विरोधी पक्षांचे अवसान गळाले; मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच घेरले

Science Exhibition | कसं असेल प्रदर्शनाचं आयोजन?

शिक्षण विस्तार अधिकारी अशोक मुंडे, शिवाजी अहिरे तसेच तालुका विज्ञान अध्यापक संघाचे कार्यवाहक कदम यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव येथे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक व स्थानिक कर्मचारी वृंद यांना विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले. २७ डिसेंबर रोजी नोंदणी, २८ डिसेंबरला उद्घाटन आणि २९ डिसेंबर रोजी बक्षिस वितरण अशा स्वरूपात या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच, या विज्ञान प्रदर्शनाची पूर्वतयारी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या असून यामध्ये केंद्रप्रमुख तथा विस्ताराधिकारी इगतपुरी राजेंद्र नांदुरकर, केंद्रप्रमुख मधुकर दराडे, तसेच गावचे सरपंच तुकाराम कोंडूळे आणि शिवाजी गाढवे सरपंच तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस. एस.आव्हाड माध्यमिक, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व्ही . डी . बैरागी तसेच प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक डी. व्ही. अहिरे आदींसह बहुसंख्य शिक्षकवृंद कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here