Taked | न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज येथे बारावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

0
17
Taked
Taked

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद |  इगतपुरी तालुक्यातील गोरगरीब होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची अमृतवाहिनी ठरलेल्या टाकेद येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज’मध्ये इयत्ता १२ वीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. सकाळी ठीक नऊ वाजता विद्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. ताराबाई रतन बांबळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ हे उपस्थित होते.(Taked)

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वतीचे पूजन व दिपप्रज्वलन करून शाळेतील विद्यार्थिनींनी प्रेम भावे स्वागत करूया, हे हंसावर्ती बसून शारदे मयूरावरती बसून या स्वागतगीताने दमदार सुरुवात केली. सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ,उपसरपंच रामचंद्र परदेशी, प्राचार्य तुकाराम साबळे, उपप्राचार्य एस. एच. पाटील, तुकाराम सारूक्ते, सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, विद्यालयाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

Nashik | नाशिकमध्ये ‘ईडीअस्त्र’ बरसले; मोठे व्यावसायिक रडारवर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम चौधरी यांनी केले तर प्रमुख मान्यवरांचा परिचय विलास खापरे यांनी केले. त्यानंतर इयत्ता १२ वीतील विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ कार्यक्रमात शिक्षकांबद्दल आपापले मत मनोगतातून व्यक्त केले. यानंतर ग्रंथपाल राजेंद्र गायकवाड, प्राचार्य तुकाराम साबळे यांनी निरोप घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धा परीक्षा येणाऱ्या परीक्षेला कसे सामोरे जावे या संदर्भात अनमोल मार्गदर्शन केले. यामध्ये शाळेतील शिक्षकवृंद शाळेतील गुणवत्ता सुख सुविधा आठवणी यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आपले आदरस्थान मनोगत व्यक्त केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MLA Anil Babar | महाराष्ट्राचे ‘पाणीदार आमदार’ हरपले…

यानंतर प्रमुख मार्गदर्शक उपस्थिती म्हणून उपजिल्हाधिकारी हिरामन झीरवाळ यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत हसत खेळत नवीन कल्पना सत्य परिस्थितीवर आधारित या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे, नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, उपसरपंच रामचंद्र परदेशी, प्राचार्य तुकाराम साबळे, उपप्राचार्य एस पाटील, सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे, शेतकरी बबन बांबळे, प्रा. विलास खापरे, प्रा. माधव चौधरी, एन. आर मतकर, एस.आर. साबळे, एस. ढोरकुले, श्रीमती अनारसे मॅडम आदींसह बहुसंख्य शिक्षक कर्मचारी विद्यार्थी वर्ग यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक म्हस्के यांनी केले. तर, आभारप्रदर्शन एन.आर.मतकर यांनी केले. कार्यक्रम समाप्तीनंतर प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या.(Taked)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here