नाशिक: सप्तश्रृंगी घाटात ST बस अपघात झाला असून या ठिकाणी 18 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. गडावरून खाली उतरत असताना हा अपघात झाला आहे. त्यातील प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी कळवण तसेच वणी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. पोलिस तसेच संबंधित विभागांचे अधिकारी घटना स्थळी पोहचले आहेत.
नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे घटना स्थळी रवाना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी घटना स्थळी जात आहे. माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असतांना हा अपघात झाला आहे. अशी प्रार्थमीक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना
– दादाजी भुसे
पालकमंत्री नाशिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम