Saptashrungi Gad | सध्या चैत्र नवरात्रोत्सवामुळे सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. लाखोंच्या संख्येने भाविक गडावर येत मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेत आहेत. मात्र, अशातच एक मोठी बातमी सप्तशृंगी गडावरून समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सप्तशृंगी गडावरून मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विकणाऱ्या तब्बल पाच दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. यात दोन हजार किलो बनावट मावा पेढा व मिठाई हस्तगत केली असून, या घटनेमुळे सप्तशृंगी गडावर एकच खळबळ उडाली आहे.(Saptashrungi Gad)
भाविक मोठ्या आस्थेने देवीचा प्रसाद घेतात. त्यामुळे हा त्यांच्या आरोग्यासोबत खेळ सुरू असल्याची नाराजी येथील नागरिक आणि भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने गडावर चैत्रोत्सवानिमित्त होणारी यात्रा आणि होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कार्यवाही करण्याची मोहीम सुरू केली असून, गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेसळयुक्त अन्न पदार्थ दिले जाऊ नये. यासाठी अन्न व औषध प्रशासन सजग आहे. (Saptashrungi Gad)
Saptashrungi Gad | ग्राहकांची दिशाभूल करून विक्री
दरम्यान, या मोहिमे अंतर्गत प्रशासनाने आधी त्र्यंबकेश्वर आणि आता वणी येथील सप्तश्रृंग गडावर धाड टाकल्या. येथे योगेश देशमुख, गोपाल कासार, प्रमोद पाटील, उमेश सूर्यवंशी, अ. उ. रासकर या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानकपणे छापे टाकून दुकानांमधील अन्न पदार्थांची तपासणी केली होती. यावेळी त्यांना सप्तश्रृंग गडाच्या रोपवे संकुल येथील परिसरात मावा पेढे, कंदीपेढे, मलाई पेढे व कलाकंद पेढे हे दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केले असल्याचे भासवून हलवा, कलाकंद, स्पेशल बर्फी व इतर तत्सम पदार्थ ग्राहकांची दिशाभूल करून विक्री केली जात असल्याचे लक्षात आले.(Saptashrungi Gad)
Nashik News | १९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त; रात्री २ पर्यंत कारवाई सुरू
पाच लाखांची भेसळयुक्त मिठाई जप्त
दरम्यान, या तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांनी अभिषेक पेढा सेंटर येथून 200 किलो पेढा आणि इतर मिलावटी अन्नपदार्थ जप्त केले. यांची एकूण किंमत 64 हजार 200 रुपये अशी आहे. तर, मयुरी पेढा सेंटर येथून 298 किलो पेढा अंदाजे किंमत 2 लाख 69 हजार 400 रुपये आणि मयूर पेढा सेंटर येथे 53 किलोंचा खाद्य पदार्थांचा साठा जप्त केला.
ज्याची किंमत अंदाजे 16 हजार 500 रुपये आहे. यासोबतच भगवती पेढा सेंटर येथून 592 किलो – किंमत 1 लाख 77 हजार 600 रुपये, मे. भगवती पेढा सेंटर येथून 187 किलो – किंमत 56 हजार 100 रुपये. असा तब्बल 5 लाख 83 हजार 800 रुपये किंमतीचा 1,944 किलो भेसळयुक्त पेढा आणि मलाई पेढा नष्ट केला आहे. (Saptashrungi Gad)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम