Sanjay Raut: राऊत साहेब हे वागणं बरं नव्हे ! जीवे मारण्याची धमकी देणारा त्यांचाच निकटवर्तीय!

0
21

Sanjay Raut: ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र राऊतांना धमकी देणारा राऊत बंधूंचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. मयूर शिंदे अस या युवकाच नाव आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांचे बंधू तसेच भांडुप मतदार संघाचे आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञात व्यक्तींना फोन करून सकाळी नऊ वाजताचा भोंगा बंद करा, अन्यथा तुम्हा दोघांनाही गोळ्या अशी धमकी देणारा फोन केला होता. संजय राऊत यांना आणि सुनील राऊत यांना अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत मुंबई पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये मयूर शिंदे याने हा बनाव रचला असल्याचं उघड झालंय. तर संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ व्हावी म्हणून धमकी देण्यात आली असल्याचा खुलासा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर मयूर शिंदे यांनी स्वतः फोन न करता आपल्या साथीदारांकडून हे काम करवून घेतले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मयुर शिंदे हा गेली अनेक वर्ष सुनील राऊत यांच्यासोबत काम करत आहे. तो कायम त्यांच्यासोबत असतो मुलुंड, भांडुप, विक्रोळी परिसरात त्याचा दबदबा आहे. सध्या मयुर शिंदे एका वेगळ्या पक्षासाठी काम करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Sanjay Raut)

महाराष्ट्र अनुभवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास शिवसृष्टीच्या माध्यमातून….

दरम्यान याप्रकरणी मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राऊत बंधू हे राजकारणी आहेत की गॅंगस्टर? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.

संजय राऊत धमकी प्रकरणात मयूर शिंदे नामक व्यक्तीला अटक केली आहे का? आणि केली असेल तर त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली हे जनतेला समजलच पाहिजे.मुंबई पोलिसांनी हे जाहीर करावं. अस ट्विट केलं असून मला धमकी देणारे देखील राऊत बंधूंच्या जवळचे असल्याने राऊत बंधू राजकारणी की गँगस्टर? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Sanjay Raut)

दरम्यान शरद पवारांनंतर राऊत बंधू यांना धमकीचा फोन आल्यानंतर या प्रकरणी सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. तसंच राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस नेमकी काय कारवाई कारणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here