Sanjay Raut : शिंदे गट फक्त पक्ष फोडण्यापुरता होता, संजय राऊतांची नाशकात जोरदार टोलेबाजी

0
65

Sanjay raut : संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. दरम्यान शिंदे गटाने अगदी दिल्लीपर्यंत जाऊन अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध केला होता. त्यावेळी दिल्लीत नेमकं काय घडलं होतं? शिंदे गट आणि भाजपच्या दिल्लीतील हायकमांडची काय चर्चा झाली होती. शिंदे गटाची कधी धुडकावून लावण्यात आली होती. याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज केला आहे.

शिंदे गटाच्या प्रचंड विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थ खातं मिळालं आहे. अजित पवार यांनी केवळ अर्थ खातंच मिळवलं नाही तर शिंदे गटाकडील मदत आणि पुनवर्सन तसेच कृषी खातंही हिसकावून घेतलं आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाने अगदी दिल्लीपर्यंत जाऊन अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध केला होता. मात्र, त्यात शिंदे गटाला यश आलं नव्हतं. दिल्लीत नेमकं काय घडलं होतं? शिंदे गट आणि भाजपच्या दिल्लीतील हायकमांडची काय चर्चा झाली होती. शिंदे गटाची मागणी कधी धुडकावून लावण्यात आली होती. याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाशकात मीडियाशी बोलताना केला आहे.

यावेळी ते म्हणाले की. माझ्या माहितीनुसार शिंदे गट दिल्लीला गेला होता. दिल्लीने यांचं काहीही ऐकलं नाही. राहायचं असेल तर राहा नाही तर जा. अर्थ खातं अजित पवार यांना द्यायचं नसेल तर अर्थ खातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजितदादांना द्या, असा प्रस्ताव दिल्लीने शिंदे गटासमोर ठेवला होता.

त्या प्रस्तावावर शिंदे गट मागे आला. ही माझी माहिती पक्की आहे. अर्थ खात्याचा कौल अजित पवार यांच्या बाजूनेच पडला आहे. तो त्यांच्याकडेच राहणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान शिंदे गट आणि अजितदादा गटात जमीन अस्मानचा फरक आहे. अजितदादाच्या गटात अनेक तालेवार नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष मंत्रीपद भोगलं आहे. अजित पवार यांचा निर्णय योग्य नाही. तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्राचं भलं होणार नाही. तरीही अजितदादांचा अनुभव दांडगा आहे. शिंदे गटाचं महत्त्व फक्त शिवसेना फोडण्यापुरतं होतं. आता त्यांचं महत्त्व संपलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

शिंदे गट हा राज्यकर्ता पक्ष नाही. येतील तसे जातील. अजित पवारांचा गट सत्तेत फार काळ राहील असं वाटत नाही. भाजपचं धोरण वापरा आणि फेका राहिलं आहे. भाजपने देशातील अनेक पक्ष वापरले आणि फेकले. दोन्ही गटाची अवस्था त्यापलिकडे होणार नाही. शिंदे गटाला अजित पवार यांची धुणीभांडी करावेच लागेल. अजित पवार यांचा निधी ही दुसरी बाजू आहे. अजित पवारच आमच्यासोबत नको. राष्ट्रवादीच नको हे शिंदे गटाचं म्हणणं होतं. आता त्यांना टाळ्या वाजवण्या शिवाय पर्याय नाही. अर्थ खातं देऊ नये म्हणून त्यांनी आपट आपट आपटली. पण काहीच झालं नाही, असा टोला त्यांनी देखील यावेळी संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here