संजय राऊतांचा मुक्काम वाढला ; ईडीच्या अधिकाऱ्यांवरही कोर्टाचे ताशेरे

0
1

संजय राऊत यांचा मुक्काम वाढला असून त्यांना दिलासा अद्याप मिळालेला नाही, यामुळे शिवसेनेला मात्र चांगलाच धक्का बसला आहे. पत्रा चाळ प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची आज न्यायालयाने दखल घेतली. संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्यांना अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही. त्याबाबत न्यायालयाने ईडी अधिकाऱ्याला आरोपपत्राची प्रत देण्यास सांगितले. न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीच्या अधिकाऱ्याने आज आरोपपत्राची प्रत देणार असल्याचे सांगितले. यामुळे एड अधिकाऱ्यांचे काय सुरू आहे असा सवाल देखील न्यायालयाने केला आहे.

कोठडीत १४ दिवसांची वाढ
ईडीच्या या वागण्यावर न्यायालयाने म्हटले की, ईडीच्या अधिकाऱ्यांचे काय चालले आहे. अद्याप तुम्ही आरोपपत्र का दिले नाही , आरोप पत्र नसल्याने संजय राऊतची कोठडी आणखी १४ दिवस वाढवण्यात आली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. शिवसेना नेत्याने या महिन्याच्या सुरुवातीला पीएमएलएशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जात संजय राऊत यांनी म्हटले होते की, राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाला विरोध केल्याने आपला छळ करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.

संजय राऊत हे आरोप फेटाळत आहेत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून, त्यात १०३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्रा चाळमध्ये तीन हजार सदनिका बांधण्यात येणार होत्या, त्यापैकी ६७२ सदनिका चाळीतील रहिवाशांना द्यायचे होते, मात्र अद्याप ते मिळालेले नाहीत. दुसरीकडे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here