Sanjay Raut | सध्या राज्यात निवडणुकांचा मौसम असून, आज राज्यात चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले असून, यामुळे अता राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाशिक दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचे राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. आज सकाळीच त्यांनी हा बॉम्ब फोडल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच झोपा उडाल्या आहेत.
बारामती, पुणे, नगर या विविध मतदार संघांत महायुतीकडून पैसे वाटले जात असल्याचे आरोप यापूर्वीही महाविकास आघाडीकडून करण्यात आले होते. दरम्यान, यातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आज सकाळीच सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला असून, हा कालचा नाशिकमधील व्हिडिओ आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरत आहेत आणि त्यांच्या बॉडीगार्डसच्या हातात बॅगा दिसत आहे.
Sanjay Raut | मोदींवर टिका करणे राऊतांना भोवले..?; नाशिकमध्ये तक्रार दाखल
Sanjay Raut | जड बॅगा पोलिस का वाहत आहेत?
रात्रीस खेळ चाले…नुसता पै पाऊस… मुख्यमंत्र्यांच्या दोन तासांच्या दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत..? यातून नाशिकला नेमका कोणता माल पोहचला.? निवडणूक आयोग राज्यात ही फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. मात्र, महाराष्ट्रात तर, अधिकृत बॅगा वाटप सुरु असल्याचे आरोप संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरलेले असून, हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर पडत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या आजूबाजूला त्यांचे अंगरक्षक आहेत. यातील दोन अंगरक्षकांच्या हातात सुटकेस व काही बॅग दिसत आहे.
Sanjay Raut | राजाभाऊसमोर महायुतीला उमेदवार मिळेना; राऊतांची नाशिकमधून जोरदार बॅटींग
मुख्यमंत्री इतक्या बॅगा का घेऊन आले?
मुख्यमंत्री शिंदे हे दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी इतक्या बॅगा का घेऊन आलेत..? असा सवाल संजय राऊत यांनी केला असून, त्यांनी पैसेवाटपाची शंका उपस्थित केली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुणे आणि नगरमध्ये पैसेवाटप झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.(Sanjay Raut)
पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपकडून पैसेवाटप सुरु असल्याचे आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले असून, त्यांनी या विरोधात सहकार नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनदेखील केले होते. तर नगरदेखील पैसेवाटप झाल्याचे आरोप शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी केले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम