Samruddhi Mahamarg | स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणार – मंत्री दादा भुसे

0
39
Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg | ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र, समृद्धी महामार्गा’च्या भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण हे आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर हेदेखील उपस्थित होते. तिसऱ्या टप्प्याचे सकाळी ११.०० वाजता इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो., ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले.(Samruddhi Mahamarg)

यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की,” महाराष्ट्राच्या विकासात नावलौकिक करणारा हा महामार्ग १५ जिल्ह्यांना जोडणार आहे. ७०१ किमी पैकी ६२५ किमी लांबीचे उद्घाटन झाले असून, बाकीचे काम हे ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊन त्याचेही लोकार्पण होईल. अनेक तीर्थ स्थळे तसेच पर्यटन स्थळे हे या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत, या शब्दांत त्यांनी महामार्गाचे कौतुक केले. (Samruddhi Mahamarg)

Samruddhi Mahamarg | समृद्धी मुंबईच्या वेशीपर्यंत; मंत्री भूसेंच्या हस्ते तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

Samruddhi Mahamarg | दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना 

तसेच यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गावर होत असलेल्या आपघातांबाबत देखील भाष्य केले असून, ते म्हणाले की,”दुर्दैवाने याठिकाणी काही दुर्घटना झाल्या असतील. मात्र, त्याचा महामार्गाशी सबंध नसुन यात काही टेक्निकल अडचणी नाहीत. स्पीड लिमिट असेल किंवा टायर पंचर होणे, वाहनात बिघाड होणे, किंवा वाहक मद्यपान प्राशन केलेला असेल, यामुळे या दुर्घटना झाल्या. मात्र यापुढे अशा प्रकारच्या काही दुर्घटना होऊ नये यासाठी आपण उपाययोजना करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.(Samruddhi Mahamarg)

Nashik | नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा

स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणार 

समृद्धी महामार्ग हा विकासाला चालना देणारा असून, यामुळे वेळेची आणि इंधनाचीदेखील बचत होणार आहे. मुंबई नागपूर हे एकमेकांना जोडले जाणार असून, त्यामुळे सगळ्यांनाच याचा फायदा होईल. जे उद्योग येऊ पाहता आहे त्यात वेगळ्या डेव्हलपमेंट होणार आहे. तसेच इंडस्ट्रियल, कृषी, रेसिडेन्सी असेल असा विविध विकास होणार असून, यात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद देखील आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपण विकासाच्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. लवकरच आपण नागपूर-गोवा, नाशिक-पुणे असे महामार्ग तयार करणार असून, msrdc च्या माध्यमातून चांगले काम करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहणार आहे. अधिकाऱ्यांनी देखील चांगले काम केले असून, त्यांचेही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी अभिनंदन केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here