Deola | देवळा तालुका काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन

0
10
Deola
Deola

देवळा | येथे विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात देवळा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष दिनकर निकम यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार बबनराव अहिरराव व पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांना निवेदन देण्यात आले. मंगळवार (दि. ४) रोजी देवळा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शहरातील शिवस्मारकासमोर साधारण दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी, शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, लोड शेडींग बंद करावे, शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा, केंद्र सरकारने कांद्या वरील २० टक्के शुल्क तत्काळ शून्य करावे, महागाई कमी करावी, युवकांना रोजगार मिळावा, पेट्रोल – डिझेलची दरवाढ कमी करावी, घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्या या प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अहिरराव व पोलीस निरीक्षक नेहेते यांना देण्यात आले.

Deola | सावकी येथील जनता विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

यावेळी तालुकाध्यक्ष दिनकर आनंदा निकम, प्रांतिक सदस्य दिलीप लक्ष्मण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी दिलीप आहेर, तालुका कार्याध्यक्ष दिलीप रामराव आहेर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील भास्कर सावंत, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अरुणा अरुण खैरणार, उपाध्यक्ष संजय जिभाऊ सावळे, प्रवीण नथू सूर्यवंशी, बाळू शिंदे, मदन महिरे, तुळशीराम अहिरे, दिलीप पाटील, गंगाधर पवार, संजय पवार, योगेश पवार, कैलास पवार, प्रमोद चव्हाण, प्रवीण पवार, रवींद्र जाधव, विजय वाघ, रती पाटील आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here