सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या म्हैसवळण घाट रस्त्यात रविवार ता.२२ सकाळी १२: १० वाजे दरम्यान विश्राम गडावरून टाकेद नाशिक च्या दिशेने निघालेल्या शैक्षणिक सहल MH 15 AK 1632 क्रमांकाच्या बसला ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.
सदर अपघाता बाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शहाबाज शेख यांनी smbt रुग्णालयातील व्यवस्थापक सूरज कडलग यांना संपर्क केला व तात्काळ एस एम बी टी रुग्णालयाकडून घटनास्थळी दोन कार्डेक रुग्णावाहिका पाठविण्यात आल्या. तोपर्यंत जखमींना स्थानिक ग्रामस्थ शिवा फोडसे ,अमोल धादवड यांच्या टीम ने स्थानिक ग्रामस्थ प्रवासी वाहनधारकांनी बाहेर काढले.
इस्कॉन मंदिर संस्थे तर्फे जवळपास चाळीस विद्यार्थी टाकेद तीर्थावर आले होते त्यानंतर ते विश्रामगड (पट्टाकिल्ला) भेट देऊन आले येतांना परतीच्या प्रवासात नाशिक नगर जिल्हा सरहद्दीवर वाघोबा जवळ गाडीचे ब्रेक फेल झाले.गाडी दरीत जाऊ नये व मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून बस चालकाने प्रसंगावधान राखताच चालकाने गाडी दरीत जाऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराच्या कडेला गाडी घसरवली यात गाडी पलटी झाली त्यानंतर डोंगराच्या बाजूला गाडी पलटी झाल्यानंतर दहा विद्यार्थी जखमी झाले तर चार जण खंबीर जखमी झाले.
जखमींनीसह सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर एस एम बी टी रुग्णालयाकडून सूरज कडलग यांनी दोन मोठ्या कार्डेक रुग्णवाहिका घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल केल्या व एस एम बी टी रुग्णालयात अपघात विभाग कक्षात सर्व डॉक्टर नर्स कर्मचारी वर्गासह बेड सह टीम सज्ज ठेवली व जखमींना रुग्णालयात दाखल करून तात्काळ उपचार चालू केले.
शर्मा टूर्स अँड ट्रॅव्हल ची ही बस असून यात इस्कॉन मंदिर संस्थेचे चाळीस विद्यार्थी होते.चालकाच्या प्रसंगावधनतेमुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.पोलीस प्रशासनाला सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल धुमसे यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शिवाजी जुंदरे,बी पी राऊत, सुहास गोसावी, आर पी लहामटे, केशव बसते, आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली व क्रेन बोलावून पुढील कार्यवाही चालू ठेवली.
दरम्यान म्हैसवळण घाट रस्त्याची गेल्या कित्येक दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे या भागात नेहमी प्रवासी वाहनधारकांना पर्यटकांना ये जा करावी लागत असते रस्त्याच्या खडतर परिस्थितीमुळे म्हैसवळण घाटात सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात तरी या रस्ता प्रश्नाकडे कायम डोळेझाक दुर्लक्ष केलेल्या संबंधित प्रशासनाने बांधकाम विभागाने लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष्य घालणे गरजेचे आहे.म्हैसवळण घाट रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक प्रवासी वाहनधारकांकडून केली जात आहे.
“म्हैसवळण घाटातील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दोन कार्डेक रुग्णवाहिका पाठवून अपघातातील जखमींना एस एम बी टी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करून अपघात कक्षात संपूर्ण डॉक्टर नर्स कर्मचारी टीम सह
उपचार सुरू केले.
– सूरज कडलग ,व्यवस्थापक एस एम बी टी रुग्णालय धामणगाव
“खड्डेमय म्हैसवळण घाट रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सातत्याने या भागात छोटे मोठे अपघात होत असतात दुर्दैवाने या अपघातात चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व एस एम बी टि रुग्णालयाच्या तात्काळ सहकार्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हा मोठा अनर्थ टळला. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या भागातून प्रवास करणारे पर्यटक,प्रवासी वाहनधारकांना रोजच मोठा संघर्षमय प्रवास करावा लागतो आहे.यावर संबंधित प्रशासनाने लक्ष्य घालून हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा.”
– राम शिंदे सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम