विषय संपला! उद्धव ठाकरेंना नाशकात सचिन अहिरेंची साथ; उसळनकर्ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह

0
45

नाशिक : जिल्ह्यातील सोशल मीडियावरील ट्रोलर्सचा आवडता चेहरा सचिन अहिरे (sachin ahire) यांनी आज थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत सर्व्यानाच धक्का दिला. यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर सचिन अहिरे ट्रोल होता की सोशल मीडिया वापरकर्ते स्वागत करता याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र नेहमीप्रमाणे त्यांना ट्रोल करण्यात आले असून , येत्या निवडणूकीत ते थेट शिवसेनेचे अजय बोरस्ते यांच्या विरोधात मैदानात उतरता की अजून कुणाला अंगावर घेता हे बघावे लागेल अशा चर्चा सुरू झाल्यात.

Blood donation रक्तदान करा अन् तंदुरुस्त रहा

गेल्या वर्षभरापासून राज्यात मोठ्या प्रमाणात ट्रोल झालेले सचिन अहिरे सर यांना उसळनकर्ते म्हणून ट्रोलर्सनी त्यांना डोक्यावर घेतले होते. काही त्यांच्याकडे मनोरंजनाचा विषय म्हणून बघत होते तर काही जण त्यांना अभ्यासू म्हणून बघत होते मात्र त्यांच्या उठसूठ लाईव्ह करण्याच्या पद्धतीने ट्रोलर्स मात्र आनंद घेत होते. मध्यंतरी त्यांनी पायी यात्रा काढत शहरातील समस्या जाणून घेत जमेल तिथे लाईव्ह केले, अहिरे यांचा दावा आहे की त्यांनी लाईव्ह केल्यावर प्रश्न सुटतात मात्र त्यांच्या या दाव्यावर तोंडसुख घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

सर लाईव्ह येतील म्हणून अनेक युवक एकत्रित येत कमेंट्सचा पाऊस पाडत असे. या आभासी दुनियेला सर भाळले आणि त्यांनी आपले लाईव्ह प्रवचनाचे कार्य सुरूच ठेवले , मध्यंतरी लोक वर्गणी गोळा गेली, मधेच स्वच्छता मोहीम राबविणे त्याचा लाईव्ह करणे यामुळे सचिन अहिरे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. पूर्वी आम आदमी पक्षात देखील होते मात्र त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. हे सर्व होत असताना अपक्ष निवडणूक लढणार म्हणून गाजावाजा केला आणि आता थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

सकाळी “संजय राऊत रात्री सचिन अहिरे”…
ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर ट्रोलर्स शांत बसतील ते कसले आता थेट संजय राऊत यांच्याशी सचिन अहिरेंची तुलना करत सकाळी संजय राऊत पत्रकार परिषद घेतील आणि रात्री सचिन अहिरे फेसबुक लाईव्ह घेतील असा टोला लगावत मोठ्या प्रमाणात अहिरे यांना ट्रोल केले आहे. अहिरे यांच्या फेसबुक पोस्टवर मोठ्या प्रमाणात टीकास्त्र सोशल मीडिया वापर कर्त्यानी केले आहे. येणाऱ्या काळात अहिरे लाईव्ह राहता की पक्षाची आब राखत समजूतदार वागता हे बघणे महत्वाचे असेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here