Rohit pawar – भाजपने शिंदेंना फोडल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलले मात्र राष्ट्रवादीतून फ़ुटलेल्ल्यांनी दोन दिवसांतच पवार साहेबांच्या विरोधात बोलायला सुरवात केल्याने ती स्क्रिप्ट भाजपनेच लिहून दिली असल्याचे लक्षात येते असा खोचक टोला आ.रोहित पवार यांनी पत्रकार परिषदे प्रसंगी लगावला आहे.
येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी (दि.८ रोजी सभा होत असून याकरिता रोहित पवार नाशकात दाखल झाले होते. नाशकात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड,आ.सुनील भुसार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले कि,येवला सोबतच इतर जिल्ह्यांचे दौरे पूर्वनियोजित होते. त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील पहिली सभा येवला येथे घेण्याचे काहीच नवीन प्रयोजन नाही. नाशकातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयासाठी त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत पोलिसांना समोर करत ताबा मिळविला मात्र जास्त दिवस ते अडवू शकत नाही. त्या गटात गेलेल्या आमदारांना त्यांनी भितीपोटी बस मध्ये बसवून हॉटेलात नेले यावरून त्यांचा त्यांच्या मनात काय चालले आहे हे सांगण्याची गरज नाही.
काल पर्यंत पवार साहेबांच्या बाजूने असलेले आज तिकडे गेले आहेत. त्यांचे चेहरे बघूनच ते किती आनंदी असतील याचा अंदाज लावता येतो. निवडणुका जवळ आल्या कि सर्व भूमिका बदलणार आहेत. नुसतंच अजित पवारांवर खापर फोडून चालणार नाही त्यांच्या आजूबाजूची लोक स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांची दिशाभूल करत आहेत. आज पर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांवर तसेच इच्छुकांवर अन्याय झाला आहे. पवार साहेबांच्या विचारावर चालणारे ते नाराज आजही साहेबांच्या पाठीशी भक्कम उभे असून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जातील.
भाजपने स्वतःच्या स्वार्थासाठी कुटुंब फोडली त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांच्याकडे सत्तेसाठी पूर्ण संख्याबळ असतांना देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रवादी फोडली याचा अर्थ असा कि उद्या मोठ नेतृत्व असलेल्या अजित पवारांना ते धोका देणार नाही हे कशावरून. यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह पवार साहेबांपासून कुणीही घेऊ शकत नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम