Robbery : चोरट्यांना ना पोलिसांचा धाक न सीसीटीव्हीची भीती ; एक कोटीं १० हजारांचे दागिने केले हातोहात लंपास

0
44

Robbery :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री धुळ्यात शासन आपल्या दारी अभियानांतर्गत येत असतानाच चोरट्यांनी मोठा हात मारत कडक सैलुट मारला आहेत.धुळे शहरातील सुवर्ण पॅलेस फोडून 1 कोटी 10 लाखांचे दागिने या चोरट्याने चोरून नेले आहेत.या चोरीच्या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाल आहे.

राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आज धुळे दौऱ्यावर येत असल्याने शहराला दोन दिवसांपासून छावणीचे स्वरुप आले आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त असून, गस्ती पथकेही सक्रीय आहेत. असे असताना काल चोरट्यांनी आग्रारोडवरील बॉम्बे लॉज शेजारी असलेले सुप्रसिध्द स्वर्ण पॅलेसमध्ये धाडसी चोरी केली . यावेळी चोरट्यांनी दुकानातील १ कोटी १० लाखांचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले. गस्तीवरील पथकाला शटरचे कुलूप तुटलेले दिसल्याने हा प्रकार समजला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार, आग्रारोडवरील बॉम्बे लॉजच्या शेजारी प्रकाश जोरावरमल चौधरी व सरदार जोरावरमल चौधरी यांचे स्वर्ण पॅलेस हे सोने-चांदीचे दुकान आहे. दुकानाच्या सुरक्षेसाठी रात्रीला वॉचमनची नियुक्ती केलेली आहे. परंतु, काल वॉचमन आपल्या मुलीच्या अॅडमिशनसाठी पुणे येथे जाणार असल्याने तो सुटीवर होता. याबाबत त्याने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानमालकाला फोन करुन तसे सांगितले होते. शिवाय, एका दिवसाचा प्रश्न असल्याने दुकानमालकाने पर्यायी वॉचमन ठेवला नाही. वॉचमन नसल्याची संधी साधत चोरटे मोटारसायकलीवर ट्रिपलशीट पहाटे अडीच वाजेच्या सुमारास धडकले. त्यांनी स्वर्ण पॅलेस या दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी काळे कपडे घातलेले असल्याने व चेहरा झाकलेला असल्याने त्यांच्यावर कुत्रे जोरजोरात भुंकू लागले. तेव्हा कुत्र्यांच्या आवाजामुळे जवळच असलेल्या एका दुकानावरील वॉचमन उठून पहायला आला. त्यावेळी तिघे चोरटे आडोशाला लपले. कोणीच नसल्याची खात्री पटल्याने वॉचमन पुन्हा आपल्या जागी गेला. त्यानंतर तिघा चोरट्यांनी चोरीचा डाव बरोबरच साधला.

 

पहाटे २.४० वाजेच्या सुमारास चोरटे दुकानात शिरले.चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर दुकानातील मुख्य कॅबीनचा काच फोडले यावेळी काचेच्या काऊंटरच्या ब्लॉकमध्ये ठेवलेल ८०० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने वरमल त्यात वेढे व गिन्नी, ७२० ग्रॅम वजनाचे वेगवेगळे दागिने, १० किलो चांदी व तसेच ड्रॉव्हर तोडून १० हजार रुपयांची रोकड असा सुमारे १ कोटी १० लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. तर या घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, एलसीबी चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, यांच्यासह इतर कर्मचारी अधिकारी ठसेतज्ञ यावेळी उपस्थित होते…..


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here