Crime News | गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला व तिचा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात सर्व विद्यार्थिनींमध्ये आणि महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलेआहे.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. यावरून, आरोपी शिक्षकावर पोक्सोसह इतर काही कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्याने ह्या पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकीदेखील दिली होती आणि तिला दमदाटी केली होती.
शिक्षकाने विद्यार्थीनीचे काही अक्षेपार्ह फोटो आपल्या फोनमध्ये ठेवले होते. हे फोटो सोशल मीडियावर व इतर ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाने तिच्यावर त्याच्या कारमध्ये वारंवार बलात्कार केला आहे.
काल मुंबईच्या गोवंडीमधूनही अशीच एक घटना उघडकीस आली
दरम्यान, एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे स्वतःचे वडीलच मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या नराधम पित्याला तातडीने अटक केली आहे.
Crime News | तिचं नक्की चुकलं काय? सरकारी महिला अधिकाऱ्याची भोसकून हत्या
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम