Skip to content

….म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंच्या या निर्णयासोबत; बंड केलेल्या आमदारांनी स्पष्टच सांगितले


द पॉईंट नाऊ ब्युरो : एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांनी आता स्पष्टच सर्व काही मांडले आहे. आमच्या व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्या गेल्या नाहीत. मात्र शिंदे साहेबांनी आमच्या व्यथा ऐकून मार्ग काढले, म्हणून आम्ही हा पर्याय निवडला असे बंड केलेल्या आमदारांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांना परत बोलावण्यासाठी शिवसेनेने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र दोघे जण वगळता इतर आमदार मात्र परत फिरकले नाहीत. यावर आता या बंड केलेल्या आमदारांनी त्यांनी उचललेल्या पावलावर स्पष्टीकरण दिले आहे.

आमची व्यथा तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी ऐकून घेतल्या नाहीत. तुमच्यापर्यंत आमची व्यथा पोहोचवली नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी आमच्या व्यथा ऐकल्या. मतदार संघातील निधी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून होत असलेला अपमान या सर्व व्यथा केवळ शिंदे यांनीच ऐकल्या. याच कारणास्तव शिंदे यांच्या या निर्णयासोबत आम्ही आहोत. असे बंड केलेल्या आमदारांनी स्पष्ट केले आहे.

सर्व आमदारांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर आता उद्धव ठाकरे यावर काय बोलतात आणि काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय मैदानात सुरू असलेल्या या गडबडीने महाराष्ट्र मात्र पोळून निघतांना दिसून येत आहे. आता यावर लवकरच काही तोडगा निघावा. याची सामान्य नागरिक अपेक्षा करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!