Raosaheb Danve | विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली असून नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत निकालाची उत्कंठा वाढली आहे. तर एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार युती किंवा आघाडी कोणालाही बहुमत मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून निकालापूर्वीच हालचाली सुरू झाल्या असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी युती-आघाडीकडून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी बंडखोर तसेच अपक्षांचा सहारा घेतला जाण्याची शक्यता आहे. अशातच “आम्हाला अपक्ष आमदारांची गरज लागणार नाही” असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एक नरेटीव सेट केला. ज्यामुळे आम्हाला भोगावे लागले. परंतु यावेळी ते यशस्वी झाली नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने येईल. आम्ही बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत. जर अपक्ष आमदारांना संपर्क साधण्याची गरज काय? आम्ही बहुमतात येत असल्याने बंडखोरांसोबत चर्चा करण्याची गरज नाही. बंडखोर हा विषय सत्ता स्थापन झाल्यानंतरचा असून अपक्ष बंडखोर असेल व त्याला महायुतीला पाठिंबा द्यायचा असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.” असे म्हटले आहे.
संजय राऊतांवर साधला निशाणा
दरम्यान, त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला असून संजय राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसून वाढलेल्या मतदानाचा टक्का हा महिलांचा आहे. लाडकी बहीण आमच्या पाठीशी आहे. लोकसभेला जी परिस्थिती होती ती आत्ता सुधारली आहे. एकनाथ शिंदे हे पूर्णपणे भाजप व मित्र पक्षांसोबत असून कार्यकर्ते काही बोलले तरी त्याला कसला अर्थ नाही. जो मुख्यमंत्री यांचा निर्णय तोच कार्यकर्त्यांचा निर्णय असेल. महायुती पूर्णपणे बहुमतात निवडून येईल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम