देवळा : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने पिक विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केली आहे.
देवळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक येथील शेतकरी संघाच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार व प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी अॅड. पगार बोलत होते.
कांद्याचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. कसमादेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्या वळण योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याचे देखील जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाट, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ , डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, युवक तालुकाध्यक्ष सुनील आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, जगन आहेर, जिल्हा पदधिकारी जगदीश पवार, रघुनाथ आहेर, शेतकरी संघाचे चेअरमन कैलास देवरे, आबा खैरनार, सरला सोनवणे, हेमलता खैरनार आदींची भाषणे झाली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी केले आहे.
यावेळी अमोल आहेर, रमेश अहिरे, नानाजी देवरे, काशिनाथ पवार,धनंजय बोरसे, साहेबराव सोनजे, सुरेश जगदाळे, दिलीप सोनवणे, बाळासाहेब मगर, रघूनाथ आहेर, सनी आहेर, मयूर अहिरे, मनोज गुजरे, साहेबराव सोनजे, सतीश सूर्यवंशी, विशाल आहेर, सुरेश जगदाळे, दिपक देशमुख, हेमंत बागुल, पप्पू बोरसे, रवि अहिरे, अनिल आहेर, सचिन देवरे, काशिनाथ खैरनार, गणेश खैरनार, संदीप खैरनार, सचिन आहेर, बंडू आहेर, जिभाऊ आहेर, खंडू अण्णा, डॉ. चंद्रकांत पाटील, कैलास अहिरे, रोहित भामरे, साहेबराव शेवाळे, संदेश बच्छाव, दादाजी बागुल, कल्पेश आहेर, दिलीप सोनवणे, संजय गायकवाड, वसंत माळी आदीनी चर्चेत सहभाग घेतला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम