Mumbai | कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर हे आज मंत्रालयाच्या दिशेने निघणार आहे. सोमाठणा या गावात सध्या तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. रविकांत तुपकर हे आज बुलढाणा व नंतर शेकडो वाहने आणि हजारो शेतकऱ्यांसह मंत्रालयाकडे निघणार आहेत.
त्यांनी दिलेल्या इशाऱ्याचा पार्श्वभूमीवर सोमाठणा गावापासून ते बुलढाण्यापर्यंत पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात ठेवलेला आहे. दरम्यान, सरकारने बळाचा वापर केला तर, रक्तपात होईल, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तसेच काहीही करुन आम्ही मंत्रालय ताब्यात घेणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करुन कापसाला १२ हजार तसेच सोयाबीनला १० हजार रुपयांचा भाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच जंगली जनावरांपासूनही शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं असेही ते म्हणाले. मुंबईला मुक्कामी जाणारच आहे, “रोक सको तो रोक लो” असा इशाराही यावेळी तुपकरांनी दिला.
मोठी बातमी | पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने नाशिककरांवरील पाणीपट्टी वाढीचं संकट टळलं!
सरकारने बळाचा वापर केल्यास रक्तपात होईल
तुपकर म्हणाले, आम्ही आज मुंबईला निघणार आहे. दरम्यान, सरकारने जर बळाचा वापर केला तर, रक्तपात होईल. आम्हला थांबवण्याचा प्रयत्न केला तर, गनिमी कावा करत आमच्या चार टीम आधीच मुंबईत दाखल झालेल्या आहेत. काहीही करून आज मंत्रालय ताब्यात घेणार. काही सत्ताधारी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मी मागे हटणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिकाही तुपकरांनी मांडली आहे.
अश्या आहेत मागण्या?
१. सोयाबीन, कापूस, तसेच इतर पिकांच्या नुकसानीचे एकरी १०,००० रुपये इतकी नुकसान भरपाई द्यावी.
२. सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार असा भाव द्यावा.
३. कापसाला प्रति क्विंटल किमान १२ हजार ५०० रुपये इतका भाव द्यावा.
४. पीक विम्याची अग्रिम व शंभर टक्के भरपाई द्यावी.
५. सरकारने कापसाला व सोयाबीनला तातडीने एका आठवड्यात योग्य हमी भाव द्यावा.
यासह अनेक मागण्यांचा यात समावेश आहे.
Deola | माळवाडीत महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त उद्या होणार रक्तदान शिबीर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम