Ration | २०२४ ह्या नव वर्षाच्या पाहिल्याच दिवशी राज्यातील रेशन (Ration) दुकानदार हे बेमुदत संप पुकारणार आहेत. दरम्यान, प्रलंबित मागण्या ह्या मान्य केल्या जाव्यात यासाठी संपूर्ण देशपातळीवर ‘ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशन‘ यांनी हा संप पुकारलेला आहे.तसेच या संपामध्ये ‘अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार’ आणि ‘किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ’ हे देखील सामील होणार आहेत. तसेच यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारीपासून पुणे आणि महाराष्ट्रातील सर्वच रेशन दुकानदार हे बेमुदत संप पुकारणार आहे. तसेच यामुळे आता सरकारची चिंता वाढणार आहे.
तसेच राज्यातील सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार असून, त्यांच्या प्रलंबित न्याय व हक्क मागण्यांच्या संदर्भात केंद्र शासन व राज्य शासन हे अत्यंत उदासीन आहे अशी टीका महासंघाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वेळी नागपूर विधान भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चाची व महासंघाच्या निवेदनाची दखल घेत राज्य सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. (Ration)
Police Bharti 2024 | नववर्षांत युवकांना मिळणार पोलीस भरतीचं बंपर गिफ्ट
मात्र, या बैठकीत फक्त आश्वासनेच देण्यात आली. सरकारकडून कुठलाही निर्णय ठोस घेतलेला नाही. त्यामुळे आता नाईलाजास्तव ‘ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन’ आणि महासंघाच्यावतीने एक जानेवारीपासून पुकारलेल्या ह्या बेमुदत संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच या आंदोलनात राज्याभरातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहनदेखील महासंघातर्फे करण्यात आलेले आहे. (Ration)
Ration | नेमक्या मागण्या काय..?
१. राज्यातील रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटीही ५० हजार इतकी करावी.
२. तसेच ‘मार्जिन मनी’ ३०० रुपये करावी.
३. ‘टू जी’ च्या ऐवजी ‘फोरजी मशीन’ देण्यात यावे.
४. कालबाह्य असलेले सर्व नियम बदलावे.
५. ‘आनंदाचा शिधा’ ही योजना कायमस्वरुपी राबवावी व कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तूदेखील रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. या आणि यासारख्या याने प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे.
Chandwad | चांदवड येथे लाचखोर सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात
दरम्यान, रेशन दुकानदारांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ‘ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशन’द्वारे पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये आता ‘अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार’ आणि ‘किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ’ यांनी देखील सामील होण्याची तयारी केली आहे. आणि याचमुळे नव वर्षात एक जानेवारीपासूनच राज्यातील सर्व रेशन दुकान हे बेमुदत बंद असणार आहेत.(Ration)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम