Rape Case | पोलिसच असं वागले तर…!, न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवावी

0
16
women abuse
women abuse

Rape Case |  पोलिस हे सामान्यांचे रक्षक असतात. रात्रीच्या वेळी जरी मुली कधी प्रवास करत असतील तर, पोलिसांमुळे त्यांना सुरक्षित वाटते. पण जर हेच रक्षक जर भक्षक बनले तर…

अशीच एक माणुसकीलाच नव्हे तर पोलिसी खाकिलाही काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, ही घटना राजस्थानमध्ये घडलेली असून, तेथे एका १८ वर्षीय मुलीवर तीन पोलिसांनी बलात्कार व शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याचा प्रकार हा तब्बल एक वर्षानंतर समोर आला आहे.(Rape Case)

या प्रकरणी, पोलिसांत तक्रार दाखल झाली असून आता ह्या घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, राजस्थान राज्याच्या अलवार ह्या जिल्ह्यात एका १८ वर्षीय मुलीवर तब्बल एक वर्षाहून अधिक काळ जबरदस्ती बलात्कार केल्याचे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपी असलेल्या तीन हवालदारांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime | ‘ती’ घरात एकटी असल्याचा डाव साधत बापानेच मुलीला…

भावावर खोटा गुन्हा

या घटनेत आरोपी हवलदारांनी पीडित मुलीवर तीन पोलिसांकडून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शनिवारी संबंधित पीडित मुलीने आरोपी असलेल्या तीन पोलिसांच्या विरोधात तक्रार केली आहे. संबंधित पीडित मुलीने यावेळी सांगितले की, ‘तिने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यास, तिच्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती तिने यावेळी पोलिसांना दिली. (Rape Case)

Crime Alert | धक्कादायक! तो न्यूड होताच तिने लगेच कॉल कट केला अन्…

एक वर्ष सामूहिक अत्याचार |(Rape Case) 

आरोपी असलेल्या ह्या तीन पोलिसांनी महिलेवर बलात्कार केला असून, या प्रकरणातील तिन्ही पोलीस हे वेगवेगळ्या पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. रैणी, राजगड व मालखेडा येथील पोलीस ठाण्यांमध्ये हे तिघे कार्यरत होते. पीडित मुलीने संबंधित पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात येऊन त्या तिघांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी तब्बल एक वर्षाहून अधिक काळ ह्या तीन पोलिसांनी पीडित मुलीवर बलात्कार केल्याची माहिती पीडितेने दिली आहे. (Rape Case)

तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल 

दरम्यान, या प्रकरणी संबंधित तिन्ही आरोपींच्या विरोधात पोलिसांत पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यावेळी पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीवर पहिल्यांदा बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी संबंधित पीडितेचे वय हे १८ वर्षे पूर्ण नव्हते. त्यामुळे संबंधित तिघांवर आता ‘पॉक्सो’ ह्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rape Case)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here