गांधीनगरमध्ये दोन वर्षांनी होणार रामलीला उत्सवाचे आयोजन

0
14

नाशिक – दरवर्षी नवरात्रीच्या काळात गांधीनगर येथील मैदानात रामलीलेचे आयोजन होते, मात्र गेली दोन वर्षे कोविडमुळे या उत्सवात खंड पडला होता. मात्र यंदा धुमधडाक्यात रामलीला उत्सवाचे आयोजन होणार आहे.

गांधीनगर येथील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात समितीची बैठक पार पडली. या बैठकीत यंदा मोठ्या उत्साहात रामलीला नाटिका सादर करण्यात येणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. गांधीनगर येथील रामलीलेचे यंदा ६७वे वर्ष आहे. त्याचसोबत सालाबादाप्रमाणे यंदाही बंगाली बांधवांचा दुर्गापूजेचा सोहळाही पार पडणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

येत्या २८ सप्टेंबरपासून गांधीनगर येथील मैदानावर रामलीला उत्सवाचे आयोजन केली जाणार आहे. रामलीलामध्ये परिसरातील आबालवृद्ध कलावंत विनामानधन तत्वावर भूमिका सादर करतात. यावेळी समितीचे महासचिव कपिल शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शक हरीश परदेशी व इतर कलावंत नाट्यातील सर्व प्रसंग, विविध वेशभूषा, कलावंत, संगीतकार, नैपथ्य यांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे.

या बैठकीला अशोक लोळगे, महेश खैरनार, ज्ञानेश्वर कुंडारिया, आदींसह रामलीला नाट्यातील कलावंत उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here