Ram Mandir | आज अयोध्येत डोळ्याचे पारणे फेडणारा नेत्रदीपक राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूजा विधींना या आठवड्यात मंगळवार पासूनच सुरुवात झालेली आहे. आज देखील प्राणप्रतिष्ठा पूजा ही तब्बल पाच तास चालणार आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी ८४ सेंकदांचा शुभ मुहूर्त आहे. आज दुपारी १२.२९ मिनिटे ते १२.३० या वेळेत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही होणार आहे. रामलल्ला विराजमान झाल्यावर महापूजा तसेच महाआरती होईल. १६ जानेवारीपासून या पूर्व विधींना सुरुवात झाली होती. या दिमाखदार सोहळ्यासाठी फक्त देशातूनच नाहीतर परदेशातूनही दिग्गज मंडळी येणार आहेत. तब्बल ५० देशांचे प्रतिनिधी हे आज या समारंभाला हजेरी लावणार आहेत.(Ram Mandir)
Ram Mandir | असा आहे कार्यक्रम
१. सकाळी १०.३० पर्यंत प्रमुख अतिथींचे आगमन
२. १२.२० ते १ वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा पूजा
३. १२.२९ ते १२.३० प्राणप्रतिष्ठा
४. त्यानंतर महापूजा व महाआरती
५. दुपारी १ ते २.१५ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मोहन भागवत आणि महंत नृत्यगोपाल दास हे संबोधन करतील.
६. २.३० वाजे पासून आमंत्रित ८,००० अतिथी दर्शन घेतील.
७. ५० देशांमधून आलेले प्रतिनिधी हे मंदिरात दर्शन घेतील.(Ram Mandir)
८. ५०० मोठमोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, इंजिनिअर, कामगार व निर्माण कार्यात सहभागी असलेले लोक दर्शन घेतील.
Ram Mandir | अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज ‘या’ कंपन्यांचे शेअर्स तेजीत
Ram Mandir | आजपर्यंतचे पूजाविधी
१. १६ जानेवारी – प्रायश्चित्त व कर्मकुटी पूजन
२. १७ जानेवारी – मूर्ती मंदिरात आणणार
३. १८ जानेवारी (सायंकाळी) – तीर्थ पूजन, जल यात्रा, जलाधिवास व गंधाधिवास
४. १९ जानेवारी (सकाळी) – औषधाधिवास, केसराधिवास, आणि घृताधिवास
५. १९ जानेवारी (सायंकाळी) – धान्याधिवास
६. २० जानेवारी (सकाळी) – शर्कराधिवास आणि फलाधिवास
७. २० जानेवारी (सायंकाळी) – पुष्पाधिवास
८. २१ जानेवारी (सकाळी) – मध्याधिवास
९. २१ जानेवारी (सायंकाळी) – शय्याधिवास(Ram Mandir)
Ram Temple | अखेर ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; ठाकरे अयोध्येत जाणार?
प्राणप्रतिष्ठा सोहळा आजच्या दिवशीच का..?
अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आजचा दिवस निवडण्यामागच एकरण असे की, आज पौष मासातील शुक्ल पक्षाची द्वादशी ही तिथी आहे. नक्षत्र मृगाशिरा व ब्रह्म योग देखील आजच्या दिवशी आहे. तसेच, इंद्र योगही आज जुळून आला आहे. दरम्यान, ज्योतिषांचे असे म्हणणे आहे की, २२ जानेवारी ही कर्म द्वादशी असून, ही द्वादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित असते. तर, या दिवशी भगवान विष्णूने कासव रूप धारण केल्याचेही सांगितले जाते. काही कथांनुसार, आजच्या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला व समुद्रमंथनात मदत केली होती.
असेही सांगितले जात आहे की, आज अनेक शुभ योग तयार होत असून, या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग तसेच रवि योग असे तब्बल तीन शुभ योग आहेत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग व अमृत सिद्धी योग या शुभ मुहूर्तावरच भगवान श्रीरामांचा जन्म झाला असल्याचेही सांगितले जाते.(Ram Mandir)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम