राजेंद्र सूर्यवंशी यांची राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड

0
40

देवळा : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत येथील देमको बँकेचे संचालक राजेंद्र नामदेव सूर्यवंशी यांची भरघोस मतांनी निवड झाली. येथील देमको बँकेचे संचालक राजेंद्र नामदेव सूर्यवंशी यांनी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन ली मुंबईच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक विभागातुन नागरी सहकारी बँक मतदार संघातून सहकार पॅनल कडून उमेदवारी केली होती.

यासाठी मंगळवारी दि २२ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली . आज झालेल्या मतमोजणीत नाशिक विभागातून देवळा येथील देमकोचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी भरघोस मतांनी निवडून आले. त्यांच्या निवडीबद्द्दल आमदार डॉ राहुल आहेर , भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, स्मार्ट एज्युकेशनचे संचालक प्रमोद पाटील आदींसह सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले आहे. नवनिवार्चित संचालक राजेंद्र सूर्यवंशी हे तत्कालीन जिल्हाधिकारी व एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे बंधू होत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here