Rajabhau Waje | अजूनही महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा हा अजून कायम असून, अजूनही या जागेवर उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराची एक फेरीही पूर्ण झाली असून, आज ते जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली असून, आज ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.(Rajabhau Waje)
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे हे आज आपला उमेदवारी दाखल करणार आहे. यावेळी भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले असून, आज महाविकास आघाडीकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. (Rajabhau Waje)
Taked | आ. माणिकराव कोकाटेंचा पाठपुरावा; 900 कोटीतून तयार होणार 106 कीमी रस्ता
Rajabhau Waje | माझ्यावर टीका करण्यासाठी काही नसल्याने…
राजाभाऊ वाजे हे ग्रामीण भागातील आहेत आणि त्यांना इंग्रजी येत नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. यावरून आता राजाभाऊ वाजे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले असून यावेळी ते म्हणाले की, “माझे शिक्षण हे एका कॉन्व्हेंट शाळेत झाले असून, प्राथमिक, माध्यमिक शाळेत मी इंग्रजीतच शिक्षण घेतले आहे. माझे शिक्षण हे साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये झाले आहे. तर, नाशिकच्या महाविद्यालयामधून मी पदवी घेतली. मी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अपील होईल, असा माझा साधा पेहराव माझा असतो. हा टिकेचा विषयच होऊ शकत नाही. मात्र, माझ्यावर टीका करण्यासाठी काहीच नसल्याने विरोधक हे असे करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. (Rajabhau Waje)
Dhule Lok Sabha | काँग्रेसला बालेकिल्ला मिळणार की सुभाष भामरे हॅटट्रिक करणार..?
तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही
“माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने माझ्यासोबत इंग्रजीत चर्चा करावी. अगदी ग्रॅमॅटिकली आणि शुद्ध इंग्रजीत मी त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहे. त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी चूक शोधली. तर मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही, असे थेट आव्हानच राजाभाऊ वाजे यांनी विरोधकांना दिले आहे. (Rajabhau Waje)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम