Raj Thackrey | हा तर पैसे देऊन बलात्कार सुरू – राज ठाकरे

0
12
Raj Thackrey
Raj Thackrey

Raj Thackrey |   आज रायगडमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की,”पुणे, नाशिक, ठाणे, आणि मुंबईची तर वाट लागलीच आहे. पण आता तुमच्या पायाखालची जमीनही निघून चालली आहे. याचा तरी तुम्हाला अंदाज आहे का? इतर राज्यातील नेते हे अलर्ट असतात. ते त्यांच्या लोकांचा आधी विचार करतात. अलिबागमधील तर काही गावं संपलीत. तिथल्या जमिनी गेल्या. पैशाची गरज म्हणून जमीनी विकल्यावर ती कोणाच्या घशात जाते आहे. त्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळतोय का?. दलाल बहुतांशी मराठी असल्याने आपला त्यांच्यावर विश्वास बसतो. तुमच्याकडून स्वस्तात जमीन घेवून सरकारला तो महागडी करून विकतो. आपल्या हाताखालच्या जमिनी जाताय”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.(Raj Thackrey)

हा तर…बलात्कार

महाराष्ट्र राज्यातील सर्व उत्तम वस्तु हिसकावल्या जात आहे. हे प्रयत्न सर्वच बाजूंनी केले जात आहेत. पैसे देऊन हा राज्यात बलात्कार सुरु आहे, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. याचं गांभीर्य सर्वांना आता तरी कळायला हवं. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या जमिनी आता जात आहेत.(Raj Thackrey)

Raj Thackrey | … तर टोलनाके जाळून टाकू; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackrey | अलिबागमधील गावं संपलीत

दरम्यान, यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ”मला याठिकाणी फक्त पत्रकारांसोबत संवाद साधायचा होता. मात्र, थेट ‘जमीन परिषद’ असे नाव देऊन जाहीर करायचं नव्हतं. इतर लोक कसे हुशारीने घुसतात ते फक्त बघा, ही कुठलीही जाहिर सभा नाही. महाराष्ट्रावर होत असलेल्या आक्रमणावर मला बोलायचं आहे. पत्रकारांवर आजही राज्यातील लोकांचा विश्वास आहे. पेपरमध्ये आलंय, म्हणून लोकांचा विश्वास बसतो. त्यामुळे आता पत्रकारांवर ही मोठी जबाबदारी आहे.”(Raj Thackrey)

”रायगड जिल्ह्यात पत्रकारांनी कोणती जबाबदारी पार पाडायची, याबाबत मी बोलणार आहे. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबईची तर वाट लागलीच आहे. मात्र, आता तुमच्या पायाखालचीही जमीन निघून जात आहे. इतर राज्यांमधील नेते अलर्ट असतात. ते आधी त्यांच्या लोकांचा विचार करतात. अलिबागमधील काही गावे संपलीत. तिथल्या जमिनी गेल्या. हाताखालच्या जमिनी आता चालल्या आहेत. ट्रान्स हार्बर, रोरो, सी-लिंक, अशा मोठमोठ्या सुविधांसाठी या जमिनी जात आहेत”, असं यावेळी राज ठाकरे म्हटले आहे.(Raj Thackrey)

Galaxy Tab A9 सीरीजचे दोन मॉडेल भारतात लाँच; १३ हजारांच्या आत Samsung चा नवा टॅबलेट

…मग कपाळावर हात मारायची वेळ येईल

दुसऱ्यांकडे नोकऱ्या करू नका. तालुक्यांमधील उद्योग हे तुमचे हवेत. पनवेलची भाषा बदलली? आता उद्या अलिबागचीही भाषा हिंदी होईल. तुम्हीही आता हिंदी बोलायला लागाल. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या संख्येत ठाणे जिल्हा हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ठाणे जिल्ह्यात ७ महानगर पालिका आहेत.

येवढी ठाण्याची लोकसंख्या वाढली. जेव्हा सगळे हातातून जाईल तेव्हा कपाळावर हात मारायची आणि पश्चाताप करायची वेळ येईल. माझा यामध्ये काहीही व्यवहार नाही. बाकीचे नेते हे व्यवहार करताय. मी वेळीच तुम्हाला जागं करतोय. परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेली नसली तरी, पुढील चार-पाच वर्षात ती हातातून जाईल. इतर अनेक राज्यांमध्ये आता जमिनी विकण्यासाठी परराज्यातील लोकांना परवानगी दिली जात नाही.’, असे यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackrey)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here