विधानसभा निवडणुका : राज्यभर सध्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकांसाठी जोमाने तयारी करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळते. विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरे सुरू केले असून या निवडणुकांमध्ये 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी या आधीच केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महायुतीला पाठिंबा दर्शवलेले राज ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत मात्र महायुतीच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ ठाणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ नागपूर येथून ते कोणत्या उमेदवारांना उभं करणार याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देत मोठा वक्तव्य केलं आहे.
सर्वमतदार संघात उमेदवार देणार- राज ठाकरे
ही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असून या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व मतदारसंघांमधून उमेदवार देणार असल्याचे नागपूर येथे बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये उदाहरण देत, 2009 मध्ये आपण 230 ते 240 जागा लढवल्या होत्या. तेव्हा या वेळेस आम्ही सव्वा 200 जागा लढवणार असून आदित्य ठाकरे यांच्या वरळीत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही उमेदवार देणार असल्याचे त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
“संघाला नागपुरात यश मिळवण्यासाठी वर्षे लागली” – राज ठाकरे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. परंतु असे असूनही तेथे काँग्रेसच्या जागा येत होत्या. भाजपाने 1952 पासून सत्ता येत येईल असे सांगितले. परंतु 2014 साली त्यांच्या हाती सत्ता आली. त्यामुळे गोष्टी घडण्यासाठी वेळ लागतो. महाराष्ट्राची जनता या राजकारणाला कंटाळले असून यावेळी सत्ता माझ्या हाती देतील. आमचा पक्ष हळूहळू वाढतो आहे. नागपूर सारखे शहरातून अनेक तरुण मंडळांची मला साथ लाभावी. अशी माझी इच्छा आहे असे त्यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम