Rain update : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे.(rain update)
या संपूर्ण हंगामात आत्तापर्यंत मुंबई उपनगरसह दक्षिण कोकणातील रायगड, उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर तसेच नांदेड अन यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा अतिरिक्त पाऊस झाला आहे. तसेच सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यात जून पासून म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत २० टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे.(rain update)
दरम्यान राजधानी मुंबईमध्ये आजपासून पुढील चार ते पाच दिवस तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई सह कोकणात देखील 10 ऑगस्ट पर्यंत पावसाचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत पाऊस पडेल असे सांगितलं जात आहे. यासोबतच मराठवाड्यात आज, विदर्भात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे.(rain update)
पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज
हवामानामध्ये अचूक अंदाज वर्तवणाऱ्या पंजाबराव डख यांनी देखील पावसाविषयी अंदाज वर्तवला असून महाराष्ट्र मधील हवेचे दाब वाढण्यास सुरुवात झाल्याने उत्तरेकडील भागात हवेचा दाब राहील यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र अल्पशा पावसाची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला वातावरण ढगाळ राहणार असून आज आणि उद्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग वाढून अल्प पावसाची शक्यता आहे.(rain update)
https://thepointnow.in/accident-4/
उत्तर महाराष्ट्रात असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये चार ते सात मिलिमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उद्या दोन ते चार मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे 26 ते 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर आठवड्याच्या सुरुवातीपासून पुढचे दोन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.(rain update)
मराठवाड्यात बीड, जालना जिल्ह्यात आठ ते नऊ मिलिमीटर पाऊस राहील तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये एक ते दोन मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. तर उद्या देखील हीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.(rain update)
पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती जिल्ह्यांमध्ये 2.5 ते 5 मिलिमीटर पाऊस आज वर्तविण्यात आला असून तीन ते सात मिली मीटर पावसाची शक्यता उद्या आहे.
मध्य विदर्भामध्ये यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात तीन ते पाच मिनिटे पाऊस आज होईल तर पाच ते दहा मि.मी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याचबरोबर मध्य विदर्भ आणि पूर्व विदर्भात आज तीन ते पाच मि.मी तर उद्या पाच ते दहा मि.मी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात चार ते आठ मि.मी आणि उद्या सात ते दहा मि.मी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हीच स्थिती पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या ठिकाणी दोन ते तीन मिनिटे पाऊस होण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम