Rahul Gandhi | राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक

0
14
Rahul Gandhi
Rahul Gandhi

Rahul Gandhi |   आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ ही सध्या बिहारमध्ये आहे. बुधवार रोजी कटिहारमध्ये त्यांनी पदयात्रा केली असून, यावेळी राहुल गांधी यांनी तेथील जनतेला अभिवादन केलं. मात्र, या यात्रेत काहीकाळ गोंधळाची परीस्थिती निर्माण झाली होती. यात राहुल गांधी थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Nashik | नाशिकमध्ये ‘ईडीअस्त्र’ बरसले; मोठे व्यावसायिक रडारवर

नंतर राहुल गांधी त्यांच्या कारमधून उतरले आणि बसमध्ये बसले. त्यानंतर तेथील प्रशासनाने जमावाला शांत केलं. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा १८ वा दिवस असून, आज राहुल गांधी यांची ही यात्रा बिहारमधून बंगालच्या दिशेने जाईल. ही यात्रा मिर्चाईबारी येथील डी.एस कॉलेजकडून लाभा येथे जनसंवाद करेल. त्यानंतर ते बंगालच्या दिशेने प्रस्थान करतील. या भारत जोडो न्याय यात्रेने किशनगंज मार्गे बिहार राज्यात प्रवेश केला होता. दरम्यान, बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्याचा दावा  प्रदेश काँग्रेसने केला आहे.(Rahul Gandhi)

अन्यायाच्या विरोधात सुरु असलेल्या या न्यायाच्या महायात्रेला बिहारमध्ये जनतेचे भरपूर प्रेम व समर्थन मिळत असल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले आहेत. न्यायाचा हक्क मिळेपर्यंत ही यात्रा सुरुच राहील, असे यवेळी त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ ही आज बिहारमधून पश्चिम बंगालम राज्यात प्रवेश करेल. दरम्यान, यावेळी बिहार राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी पश्चिम बंगाल राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याकडे ‘राष्ट्रीय ध्वज’ सोपविला.

MLA Anil Babar | महाराष्ट्राचे ‘पाणीदार आमदार’ हरपले…

Rahul Gandhi | आज पुन्हा यात्रा बंगालमध्ये 

आज ही यात्रा दुसऱ्यांदा बंगालमध्ये प्रवेश करेल. याआधीही २५ जानेवारी रोजी राहुल गांधींची ही ‘न्याय यात्रा’ पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली होती. ही यात्रा आसाम राज्यातून पश्चिम बंगालमधून बिहारमध्ये गेली होती. तसेच यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की, “पश्चिम बंगालमध्ये येऊन मी खूप खूश आहे. इथे आम्ही तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि तुमच्यासोबत उभे राहण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही या यात्रे दरम्यान न्याय शब्द हा यासाठी जोडलेला आहे की, आज आपला संपूर्ण देश हा अन्याय व्याप्त झाला आहे.”(Rahul Gandhi)

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here