सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कांदा निर्यात शुल्क हटविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी एका निवेदनाद्वारे सोमवारी (दि.16) रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिले. नाशिक जिल्ह्यातील तसेच चांदवड देवळा मतदार संघामधील शेतकऱ्यांचे कांदा हे प्रमुख पीक आहे. कांद्याचा भाव स्थिर राहण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी विविध उपाययोजना राबविण्यात येतात.
Deola | नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश; नुकसानग्रस्त पिकांची आ. राहुल आहेर यांनी केली पाहणी
जसे की, किमान निर्यात शुल्क आकारणी करणे (MEP), नाफेडकडून कांदा खरेदी करणे आदी उपाययोजना राबवून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्यात समतोल राखला जातो. परंतु सद्यस्थितीत लेट खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले आहे. त्यात अचानकपणे सरासरी १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल भाव कोसळला असून कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात यावे अशी आग्रही मागणी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेनात आ. डॉ. राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम