Rahul Aaher | राहुल आहेरांनी आघाडी सरकारला घेरलं; पण बंधुंवर बोलणं टाळलं

0
67
#image_title

Rahul Aaher | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर, नाशकात राजकीय घडामोडींना वेग आला. त्यात देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी यादी जाहीर होताच राजकीय नाट्य सुरू झाले असून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या दोन भावांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळते आहे. देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर देवळा-चांदवड मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलले असून केदा आहेरांनी बंधू राहुल आहेरांविरोधात भूमिका घेतली आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी देवळ्यामध्ये कार्यकर्ता संवाद मिळावा घेत पक्षाने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. यावेळी त्यांनी बंधू राहुल आहेरांवरही सडकून टीका केली.

Rahul Aaher | ‘दादा’ की ‘नाना’ चर्चेला पूर्णविराम; राहुल आहेरांची चांदवड-देवळा मतदारसंघातून माघार

चांदवड येथे राहुल आहेर यांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

दरम्यान, आज 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी राहुल आहेरांची चांदवड येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी, “दहा वर्ष खोटं काम केलं नाही. त्यामुळे घाबरण्याचे काम नाही. जर आघाडी सरकार मध्ये आलं नसतं. गोदावरी पार प्रकलप ही मार्गी लागला नसता. मागचे तीन वर्ष जर आपले गेले नसते. तर आपली अनेक स्वप्न पूर्ण झाली असती. २०२० मध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी इतर तालुक्यांना नुकसानभरपाई आली. पण आपला तालुका जाणीवपूर्वक त्यामधून वगळला गेला. आपल्यावर अन्याय करण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले.” असे म्हणत आपण केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

Keda Aaher | केदा आहेर बंडखोरी करणार…?; एल्गार मेळाव्यातून निवडणुकीच रणशिंग फुंकणार!

केदा आहेरांविषयी बोलणे टाळले

या सभेवेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीवर टीका करत आपण केलेल्या विकास कामांबाबत भाष्य केले यावेळी त्यांनी केदा आहेरांकडून करण्यात आलेला टिकेवर बोलणे टाकल्याचे दिसून आले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here