‘राडा’ चित्रपटात ‘राडा’ करणार ‘काटा इष्काचा रुतला’ हे विष्णू थोरे यांचे गीत

0
1

नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात गीतकारांची परंपरा असून अनेक चांगली गाणी मराठी चित्रपट सृष्टीला येथील गीतकारांनी दिली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे चांदवड येथील कवी,चित्रकार व गीतकार विष्णू थोरे यांचे सांगता येईल. त्यांचा ‘धूळपेरा उसवता’ हा कविता संग्रह प्रसिद्ध असून अनेक पुरस्कारही त्यांच्या संग्रहाला मिळालेले आहे.चित्रकार म्हणून देखील ते महाराष्ट्रात परिचित असून जवळ जवळ पाचशेच्या वर पुस्तकांची त्यांनी मुखपृष्ठे रेखाटली आहेत. शेतीमातीवर कविता लिहिणार हा कवी आजही शेतीत रममाण झालेला आहे.

येत्या 23 सप्टेंबर रोजी दाक्षिणात्य चित्रपटांच्या धर्तीवर आधारीत कमालीची ऍक्शन कॉमेडी,रोमँटिक सिन असलेला ‘राडा’ हा मराठी चित्रपट रिलीज होत आहे.या चित्रपटाचे पोस्टर,ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ करीत असून त्याला जोरदार प्रतिसादही मिळत आहे.

चांदवड येथील कवी ,गीतकार विष्णू थोरे यांचे ‘काटा इष्काचा रुतला’ हे एक गीत या चित्रपटात असून ते प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायिले आहे. मयुरेश केळकर यांचे संगीत असलेले हे गीत महाराष्ट्रात नक्कीच ‘राडा’ करणार यात शंका नाही.

या आधीही समीर आशा पाटील यांच्या ‘चौर्य’ या चित्रपटासाठी विष्णू थोरे यांनी लिहिलेले ‘पायरीला गेले
तडे,पाय झाले जड’देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड’ हे गीत खूप लोकप्रिय झाले होते. ‘पीटर’ या चित्रपटासाठीही विष्णू थोरे यांनी लिहिलेले ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजातील ‘सुन्या सुन्या काळजाचं,सुनं सुनं रान हे भावस्पर्शी गीत श्रवणीय असेच होते.आगामी दिगर्शक पांडुरंग जाधव यांच्या ‘गैरी’ या चित्रपटासाठी तसेच जैतर आणि घाटी या दोन चित्रपटासाठी देखील विष्णू थोरे यांनी एक -एक गीत लिहिले आहे.

‘राडा’ या चित्रपटाची निर्मिती नांदेड येथील उद्योजक राम शेट्टी यांनी केली असून अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार प्रथमच सिनेविश्वात पदार्पण करीत आहे. रमेश व्ही .पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत , सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरच्या या चित्रपटाचे सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प पडगीलवार कॉर्पोरेशन आहेत . चित्रपटात मिलिंद गुणाजी , संजय खापरे , गणेश यादव , अजय राठोड , गणेश आचार्य , निशिगंधा वाड , योगिता चव्हाण , सिया पाटील , हीना पांचाळ , शिल्पा ठाकरे या कलाकारांचा अभिनय बघावयास मिळणार आहे . रितेश सोपान नरवाडे यांनी दिग्दर्शन , संवाद आणि स्क्रीन प्ले अशा तीनही धुरा सांभाळल्या आहेत . विशेष म्हणजे या चित्रपटापेक्षा त्यातील गाणी सध्या सर्वत्र चर्चेत असली , तरी सर्वांचे लाडके मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री , नृत्यांगना हीना पांचाळ यांनी धमाकेदार नृत्याविष्कार गाण्यांतून दाखविला आहे . ही गाणी स्वप्नील बांदोडकर , जसराज जोशी , बेला शेंडे , ऊर्मिला धनगर , मधुर शिंदे यांनी स्वरबद्ध केली आहेत .

जाफर सागर व विष्णू थोरे यांनी लिहिलेल्या गाण्यांसह चित्रपटात संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना आणि मयुरेश केळकर यांनी सांभाळली आहे . के . प्रवीण याने हा भव्य अॅक्शनपट कॅमेऱ्यात कैद केला आहे . २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत असून नाशिक जिल्हातील गीतकार विष्णू थोरे यांचे काय ‘राडा’ करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here