Pune News | काय सांगता..! ६१ लाखांची मटणाची उधारी

0
12
Pune News
Pune News

Pune News |  पुणे शहरात दिवसेंदिवस आगळ्या वेगळ्या बातम्या ह्या सध्या चर्चेत आहेत. कालच एक ‘पोपट दे नाहीतर, घटस्फोट नाही” ही हास्यास्पद घटस्फोटाची घटना राज्यभरात चांगलीच गाजत असताना, आता “६१ लाखांची, मटणाची उधारी” हे नवे प्रकरण आता समोर आले आहे. दरम्यान, आज सोशल मिडियावर देखील हे प्रकरण चांगलेच गाजले होते. (Pune News)

६१ लाखांची मटणाची उधारी न दिल्यामुळे पुणे येथे एका मटण विक्रेत्याने दोघांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केलेला आहे. लष्कर परिसरातील मटण मार्केट येथील एका मटण विक्रेत्याने ह्या दोघे मटणप्रेमींच्या विरोधात लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. उधार मटण घेतले पण, आता पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ह्या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. दरम्यान, लष्कर पोलिसांनी या प्रकरणी आता संबंधित आरोपींच्या विरोधात फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या प्रकाराची पुढील चौकशी सुरू आहे.(Pune News)

Thackeray Brothers | ठाकरे बंधूंची भेट; कुठे अन् काय झाली चर्चा…वाचा सविस्तर

अधिक माहितीनुसार, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे लष्कर पोलिसांनी अफझल युसूफ बागवान व अहतेशाम अयाज बागवान या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या दोघांनी संबंधित मटण विक्रेत्याची मटणाची तब्बल ६१ लाख रुपयांची उधारी देण्यास टाळाटाळ केल्याचं ह्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी अफझल आणि अहतेशाम यांनी त्यांच्या हॉटेलसाठी ह्या विक्रेत्याकडून मटण खरेदी केले होते.
त्यांच्या हॉटेलसाठी दररोज मटण, चाप, खिमा, गुर्दा इत्यादी ते खरेदी करत असे. हे दोन्ही आरोपी लष्कर परिसरात असलेल्या मटण मार्केटमधून मटण खरेदी करायचे. संबंधित मटण विक्रेत्याकडून २०१९ ते २०२३ या चार वर्षांत त्यांनी तब्बल दोन कोटी ९१ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे मटण खरेदी केलेले होते. अशी माहिती तक्रारदार मटण विक्रेत्याने तक्रारीत केली आहे. (Pune News)

Alcohol news | ‘थर्टीफर्स्ट’साठी मद्यप्रेमींना राज्य सरकारची ‘गुड न्यूज’

ह्या दोघंही आरोपींनी मटन विक्रेत्याकडील एकूण उधारीपैकी तब्बल २ कोटी ३० लाख १९ हजार रुपये हे परत केले होते. मात्र, ६१ लाख ६२ हजार रुपये इतकी रक्कम अजूनही बाकी असून, ही शिल्लक रक्कम देण्यासाठी संबंधित दोन्ही हॉटेल चालकांकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे शेवटी ह्या मटण विक्रेत्याने लष्कर पोलिसांत धाव घेत ह्या दोघां विरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास लष्कर पोलिस करित आहेत.(Pune News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here