Pune Crime | कुठल्याही नात्यात विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. विश्वास डगमगला की नात्यात उणीवा निर्माण होतात आणि विश्वास नसलेलं नातं हे अधिक धोकादायक असतं. अशीच एक १० वर्षांच्या प्रेमसंबंधांचा संशयातून थरारक शेवट झाल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.
या घटनेत प्रियकराने त्याच्या प्रेयसीला OYO रूममध्ये नेऊन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना रविवारी पुण्यातील हिंजवडी भागात घडली. दरम्यान, या घटनेत आयटी इंजिनियर असलेल्या मुलीचा मृत्यू झाला असून, मुंबई पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अधिक महितीनुसार, या दोघांचे गेल्या १० वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. हे दोघेही मूळचे लखनऊ येथील असून, आरोपी मुलगा लखनऊमध्ये तर मुलगी पुण्यात काम करत होते. दरम्यान, या दोघांच्या नात्यात संशयाने शिरकाव केला अन् त्यांच्या या १० वर्षांच्या प्रेमाचा करुण अंत झाला. या घटनेमुळे हिंजवडीच नाहीतर संपूर्ण शहरच हादरले आहे.(Pune Crime)
Crime News | तीन बायकांचे शौक पूर्ण करण्यासाठी, तरुण बनला….
Pune Crime | नेमकं प्रकरण काय..?
या घटनेत हत्या झालेल्या मुलीचे नाव हे वंदना द्विदेदी असे आहे. तर, ऋषभ राजेश निगम असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. हे दोघेही मूळ लखनऊ येथील रहिवासी आहेत. मृत वंदना ही पुण्यात कामासाठी राहत होती. तर ऋषभ हा लखनऊ मध्येच कार्यरत होता. दोघेही लखनऊमध्ये एकाच परिसरात वास्तव्यास असल्याने त्यांची जुनी ओळख आहे. या दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, २५ जानेवारी रोजी आरोपी ऋषभ हा पुण्यात त्याची प्रेयसी वंदनाला भेटायला आला.(Pune Crime)
लक्ष्मी चौक येथील OYO हॉटेलमधील एका रुममध्ये ते दोघेही दोन दिवसांपासून राहत होते. मात्र, रविवारी त्यांच्यात वाद झाले आणि हे वाद टोकाला गेले. या वादातूनच आरोपीने वंदानावर एकापाठोपाठ पाच गोळ्या झाडल्या आणि त्यात ती जागीच मृत्युमुखी पडली. वंदनावर आरोपीने पाच गोळ्या झाडल्यानंतर तो हॉटेलमधून निघून जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आरोपीकडे बंदूक आली कुठून? पाच गोळ्या झाडल्यानंतरही हॉटेलमध्ये कोणालाही आवाज का आला नाही? याबाबत पोलिस तपास करत आहेत.
Crime News | २१ वर्ष लहान प्रेयसीने लग्नाला नकार दिला अन् मॅनेजरने ऑफिसमध्येच..
मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
दरम्यान, हत्येबाबात माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळाळी धाव घेतली. संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकाकडून मास्टर चावी घेत खोलीचे कुलूप उघडले असता, त्यांना तिथे मृत वंदनाचा मृतदेह सापडला. मात्र, तोपर्यंत आरोपी मुंबईला पसार झाला होता. पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर चौकशीदरम्यान ऋषभने गुन्हा कबूल केला.(Pune Crime)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम