Pune Crime | कारच्या धक्क्याने वाद… टोळक्याने केला तरुणावर हल्ला; भाच्यासमोर मामाची हत्या

0
54
Pune Crime
Pune Crime

Pune Crime | पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं मात्र सध्या गुन्हेगारीचं माहेरघर बनत चाललेल्या पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडलेली आहे. हडपसर परिसरात हा प्रकार घडलेला असून फक्त कारचा धक्का लागला म्हणून एका 30 वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 10 जणांच्या टोळक्याने कारचालकावर धारदार शस्त्राने वार करीत तसेच दगडाने ठेचून ठार करण्यात आलं. शेवाळवाडी येथे मंगळवारी (दि. १२) रोजी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

यात अभिषेक संजय भोसले (30) असं खून झालेल्या कारचालकाचे नाव असून याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट यांच्यासह आणखी 7 ते 8 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान याबाबत अभिषेक याचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (१८) याने फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.

Beed Crime | शाळेत शिक्षिकांचे अश्लील कृत्य, घटनेमुळे विद्यार्थी हादरले

Pune Crime

पुढिल माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, अभिषेक भोसले हा आपला भाचा अथर्वसोबत कारमधून रात्री 10 च्या सुमारास बाहेर पडला त्यानंतर फुरसुंगी-चंदवाडी रस्त्यावरून ते जात असताना तिथे विलास सकट आणि कैलास सकट यांचं काही कारणावरुन भांडण सुरु झालं. यावेळी त्यांचा कारला धक्का लागला आणि यामुळे अभिषेकने तुमच्या भांडणात माझ्या गाडीचं नुकसान करु नका असं सांगितलं होतं. यावरुन विलास सकट याने अभिषेकशी वाद घालण्यास सुरुवात केली असता आरोपींसह त्यांच्या सर्व साथीदारांनी अभिषेक आणि अथर्व याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी धारदार शस्त्र आणि दगडाने अभिषेकवर हल्ला करण्यास सुरुवात केली असता या हल्ल्यात अभिषेक गंभीर जखमी झाला. अर्थव म्हणजेच त्या भाच्याने मध्यस्थी करत वाचवण्याचा अभिषेकला प्रयत्न केला असता आरोपींनी अर्थवलाही मारहाण केली. मात्र त्यानंतर आरोपी तिथून फरार झाले. अभिषेक याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच अभिषेकचा मृत्यू झाला तसेच अभिषेकचा भाचा अथर्व याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here