Pune Crime | विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक हृदयद्रावक घटना ह्या पुण्यात घडताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना ही पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. प्रेयसीला घरामध्ये डांबून ठेवत तिच्यावर अमाणुषपणे लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील कोंढवा खुर्द येथे घडली आहे.(Pune Crime)
संबंधित आरोपी तरुणाने त्याच्या प्रेयसीला मानसिक त्रास देण्यासाठी तिचा मोबाइल व लॅपटॉप हिसकावून घेतला होता. तसेच ती येथून पळून जाऊ नये. म्हणून घरातील कुत्र्यांना गॅलरीतून फेकून देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंढवा येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून कोंढवा भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अधिक माहितीनुसार, हा संपूर्ण संतापजनक प्रकार हा मे महिन्यापासून ते ६ डिसेंबर २०२३ या संपूर्ण काळात घडलेला आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाची ह्या पीडित तरुणीशी नोव्हेंबर २०२२ मध्ये ओळख झालेली होती. त्यानंतर ह्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि संबंधित आरोपीने मे महिन्यात पीडित तरुणीला लग्नाची मागणी घातली.
दरम्यान, तिनेदेखील ह्या लग्नास होकार दिला होता. आणि यानंतर ते दोघे एकत्रित फिरायलाही गेले होते. संबंधित पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना देखील यांच्या दोघांच्या संबंधांबद्दल माहिती होती. मात्र, या नंतर आरोपी तरुणाने पीडित तरुणीसोबत वारंवार जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्याकडील मोबाइल व लॅपटॉप देखील काढून घेतला.(Pune Crime)
यासोबतच तो तिला मानसिक त्रास देण्यासाठी, “तू जर, पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर घरातील कुत्र्यांना गॅलरीतून तुझ्यावर फेकून देईल,” अशी धमकी देखील त्याने तिला दिली होती आणि तिला घरात डांबून ठेवत घराबाहेर पडण्यास मज्जाव केला होता.
या नंतर पीडित तरुणीच्या डोक्यात एका कठीण वस्तूने मारत तिला गंभीर जखमी केले. ह्या आरोपी तरुणाने पीडित तरुणीला त्याच्या पुण्यातील कोंढवा परीसरातील घरात तब्बल चार ते पाच दिवस जबरदस्ती डांबून ठेवले होते. तसेच तिला अमानुषरित्या बेदम मारहाणही केली. आरोपी तरुणाने तिच्यासोबत जबरदस्ती करत शारीरिक संबंध ठेवले असल्याचेही पीडित तरुणीने पोलिसांत केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. या प्रकरणाचा सविस्तर पुढील तपास उपनिरीक्षक बालाजी डिगोळे हे करीत आहेत.(Pune Crime)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा