Skip to content

PS2 Collection : ऐश्वर्या-विक्रमच्या ‘पोनीयिन सेल्वन 2’ ने केला दोन दिवसांत 100 कोटींचा गल्ला पार


किर्ती आरोटे

PS2 Collection : ऐश्वर्या राय आणि विक्रमचा ‘पोनियिन सेलवन 2’ बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. PS2 ने कदाचित सरासरी ओपनिंग केली असेल, परंतु दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ रिलीज झालेला  असूनही हा चित्रपट उत्कृष्ट व्यवसाय करताना दिसत आहे. दुस-या दिवशी ‘पोनीयिन सेल्वन – पार्ट 2’ ने जगभरात १०० कोटींचा आकडा गाठला आहे. (PS2 Collection )

PS2 Collection : ऐश्वर्या-विक्रमच्या ‘पोनीयिन सेल्वन 2’ ने केला दोन दिवसांत 100 कोटींचा गल्ला पार

निर्मात्यांसाठी हे निश्चितच दिलासा देणारे आकडे आहेत. हिंदीत जरी त्याचा व्यवसाय काही विशेष नाही. चला तर मग सांगूया की ‘पोनियिन सेल्वन 2’ ने शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला.दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला पोन्नियिन सेल्वन 2 हा 2022 साली प्रदर्शित झालेल्या PS1 चा दुसरा भाग आहे. PS2 ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 31 कोटी रुपयांची कमाई केली. आता दुसऱ्या दिवशी त्याची कमाई देशात घसरली आहे. सॅकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, ‘पोनियिन सेल्‍वन 2’ ने दुस-या दिवशी 26.2 कोटी रुपये कमावले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुस-या दिवशी याने हिंदीत धार निर्माण केली आहे.

चोल वंशाच्या कारकिर्दीवर आधारित ‘पोनियिन सेल्वन 2’ ने पहिल्या दिवशी हिंदी बाजारातून 1.7 कोटी रुपये कमवले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 2.3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मल्याळममध्ये 1.1 कोटी, तमिळमध्ये 20.26 कोटी आणि तेलगूमध्ये 2.5 कोटी कमावले. यासह ‘पोनियिन सेल्वन 2’चे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 50.2 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ‘पोनियिनऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, कार्ती, त्रिशा कृष्णन, जयम रवी, शोभिता आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांसारख्या अनेक स्टार्सनी सजलेल्या ‘पोनियिन सेल्वन 2′ ने जगभरात थैमान घातले आहे. (PS2 Collection )

अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने जगभरात 110 कोटींचा गल्ला जमवला आहे. PS2 कलेक्शन तमिळ भाषेत घसरले  नसते तर ते देशातही चांगले झाले असते. सेल्वन 2’ ने 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊन विक्रम केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!