Pritam Munde | एकीकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करून त्यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्णही केली आहे. मात्र, महायुतीत अजूनही नाशिकच्या जागेवरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. सगळेच पक्ष या जागेसाठी अडून आहेत. तर, तिन्ही पक्षातून दररोज नवीन इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत आहेत. अगदी कालपर्यंत जवळपास उमेदवार निश्चित झाले असून, हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, आज अचानक प्रीतम मुंडे यांचे नाव समोर आले आहे. तर, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pritam Munde)
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (pankaja munde) या म्हणाल्या की,”मला बीड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली पण आता प्रितम मुंडेंचं काय..? असा अनेक जणांना प्रश्न पडला आहे. मात्र तुम्ही प्रीतम मुंडेंची काळजी करू नका. मी तिला नाशिक लोकसभा मतदार संघातून (nashik loksabha constituency) उभं करेल, असा दावा पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे आता नाशिक लोकसभेच्या इच्छुकांच्या यादीत प्रीतम मुंडे यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. (Pritam Munde)
महायुतीकडून ओबीसी नेत्याचा शोध?
आधीच नाशिकच्या जागेवरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच पंकजा मुंडेंच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर, भुजबळांची माघार, बोरस्ते यांची निवडणूक लढवण्याची इच्छा, भाजपचा (bjp)नाशिकच्या जागेसाठीचा आग्रह, यानंतर आता पंकजा मुंडेंचा दावा. यामुळे मोठा सस्पेन्स तयार झालेल्या या जागेवर कोणाला उमेदवारी मिळेल. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर, यानंतर आता खरंच भाजपकडून नाशिकमध्ये थेट प्रीतम मुंडे यांना तिकीट मिळणार का? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Pritam Munde)
नाशिकच्या तिकीटाच्या शर्यतीत अनेक नाटकीय घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी जाहीर होत नसल्याने नाशिक लोकसभा निवडणुकीतून जाहीर माघार घेतली. तर, भुजबळांनी माघार घेतल्यानंतर महायुतीकडून नव्या ओबीसी नेत्याचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता प्रीतम मुंडे या महायुतीच्या नाशिक लोकसभेसाठीच्या ओबीसी नेत्या असणार का..? हे पहावे लागणार आहे.
Pritam Munde | गोडसेंचे प्रयत्न फेल..?
दरम्यान, नाशिकमध्ये सध्या महायुतीत अनेक नाट्यमय घडामोडी सुरू असुन, अनेक वेळा शक्तिप्रदर्शन, मुंबई वारी, ठाणे वारी, मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीगाठी आणि आश्वासने देऊनही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होत नाही. (Pritam Munde)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम