प्रेमाच्या नशेत नवऱ्याला रोज दिले विष ; 17 दिवसात नवऱ्याचा मृत्यू

0
8

मुंबई : सध्या देशात क्रूर कृत्यांची स्पर्धा सुरू असल्याचे चित्र सर्वत्र आहे. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली असून सांताक्रूझ परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने मोठा खुलासा केला आहे. क्राइम ब्रँचने कविता आणि तिचा प्रियकर हितेश जैन यांना अटक केली आहे. खरं तर, कविता पती कमलकांत शाह यांच्या जेवणात आर्सेनिक आणि थॅलियमचं मिश्रण करत होती. जिथे खाण्यापिण्यात स्लो पॉयझन मिळत असल्याने कमलची प्रकृती सतत खालावत चालली होती.

यामुळे कमलकांत यांना ३ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर १७ दिवसांनी कमलकांत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयावरून डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून त्या महिलेने तिच्या प्रियकरासह पती कमलकांत शहा (45) यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?

सूत्रांच्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी कमलकांत यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्या ठिकाणी कमलकांत १९ सप्टेंबरपर्यंत दाखल होता, त्यादरम्यान डॉक्टरांना कमलकांतच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने डॉक्टरांच्या पथकाने कमलकांत यांच्या रक्ताची हेवी मेटल चाचणी केली, या चाचणीच्या अहवालामुळे डॉक्टरांचा संशय बळावला.

कारण, चाचणी अहवालात, शरीरात आर्सेनिक आणि थॅलियम धातूची पातळी लक्षणीयरीत्या वाढली होती. यादरम्यान डॉक्टरांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून हा गुन्हा सांताक्रूझ पोलिस ठाण्यात सोपवला.

पोलिसांनी आरोपीची पत्नी आणि प्रियकराला अटक केली

मात्र, या प्रकरणाचा तपास सांताक्रूझ पोलिस ठाण्याऐवजी गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवण्यात आला होता, त्यामुळे गुन्हे शाखेने तपास सुरू करताना पत्नीसह अनेकांचे वैद्यकीय अहवाल आणि जबाब नोंदवले.

त्यानंतर पोलीस पथकाला मृत कमलकांतची पत्नी कविता हिने प्रियकर हितेशसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पत्नी कविता आणि तिचा प्रियकर हितेश यांना अटक केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here