Chhatrapati Sambhajinagar : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी वाद चांगलाच पेटताना दिसत असून, एकीकडे आज सोलापुरात मनोज जरांगे यांची शांतता जनजागृती रॅली सुरू असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. दरम्यान, आजच्या या रॅलीत प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या आणि सगेसोयऱ्यांच्या मागणीलाही विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये (OBC Reservation) कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नसून, आरक्षणासंदर्भात आम्ही ओबीसी समाजाला भूमिका घ्यायला लावू, असा निर्धार यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. तसेच यावेळी बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीलाही आमचा विरोध असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले.
Dikshabhumi | दिक्षाभूमी विकासकामाच्या वादाला हिंसक वळण; आंबेडकरी अनुयायांकडून कामाची तोडफोड, जाळपोळ
गोरगरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेत बसवावं
कुणबी समाजाचा ओबीसीत (OBC) समावेश आहे. त्यामुळे त्यांनी कागदपत्र दाखल केल्यास त्यांना आरक्षण मिळू शकेल. ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत आम्ही सर्व राजकीय पक्षांना आपली भूमिका घ्यायला सांगणार आहोत. कारण आरक्षणाच्या लढाईत राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर, ओबीसीत मराठा समाजाचा कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नसल्यामुळे गोरगरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेत बसावण्याचे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.
Maha Vikas Aghadi | महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरे अन् आंबेडकरांचे सूर जुळेना
जरांगे पाटील यांनी सरकारमध्ये शिरकाव करावा
माझी मनोज जरांगेंशी चर्चा झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की, राज्याच्या राजकारणात 169 कुटुंब आहेत जी महाराष्ट्रावर राज्य करत आहे. ते सगळे मराठा समाजातीलच आहेत. त्यामुळे ते जरी मराठा समाजातीलच असले तरी ते नात्यागोत्याचं सरकार आहे, असं मी म्हणतो. त्यामुळे या नात्यागोत्याच्या सरकारमध्ये जरांगे पाटील यांनी शिरकाव करण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम