24 गोळ्या आरपार, डोक्यातही सापडली बुलेट; सिद्धू मुसेवालाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

0
16

मनसा: पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवाला यांचे पोस्टमॉर्टम पूर्ण झाले आहे. सोमवारी रात्री पाच डॉक्टरांच्या पथकाने मुसेवाला यांच्या मृतदेहाचे पीएम केले. मात्र, हा अहवाल अद्याप पोलिसांना देण्यात आलेला नाही. परंतु, अत्याधुनिक बंदुकीतून झाडण्यात आलेल्या 24 गोळ्या मुसेवाला यांच्या शरीरातून गेल्या, तर एक डोक्याच्या हाडात अडकल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्लेखोरांनी सुमारे 30 राउंड फायर केले होते.

मनसा जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, शवविच्छेदनादरम्यान मुसेवाला यांच्या शरीरावर दोन डझन गोळ्यांच्या जखमा आढळल्या. रिपोर्टनुसार त्यांचा मृत्यू जास्त रक्तस्त्रावामुळे झाला. त्याच वेळी, अंतर्गत अवयवांना दुखापत झाल्याची पुष्टी देखील झाली आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेराचे नमुने सुरक्षित ठेवण्यात आले असून ते पुढील तपासासाठी पाठवले जात असल्याचे सांगण्यात आले. तथापि, रुग्णालयाने पोस्टमार्टमचे निकाल पोलिसांना दिलेले नाहीत.

पोलिसांची कारवाईही तीव्र झाली

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुसेवाला यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली न्यायिक आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, सर्व संशयितांची ओळख पटली असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे राज्य सरकारी पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

उत्तराखंडमधून पाच संशयितांना अटक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी सोमवारी उत्तराखंडमधून पाच संशयितांना अटक केली. हे पाच जण उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील हेमकुंड साहिब गुरुद्वाराला जात होते. माहिती देणार्‍याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी करून मूसेवाला हत्येमध्ये त्यांची भूमिका काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here