Raosaheb Danve | महायुतीने विधानसभा निवडणुकीत २०० चा आकडा पार करत दणदणीत विजय मिळवला. यानंतर आता ईव्हीएम हॅक केल्याशिवाय महायुतीला हा विजय मिळणे शक्य नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असून देशात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याकरिता काँग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. अशातच यावर आता भाजपचे माजी नेते केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी बरोबर विरोधकांच्या टीकेवर पलटवार करत जाहीर आव्हान दिले आहे. “ईव्हीएम हॅक करता येत असेल, तर करून दाखवा.” अशा शब्दात दानवे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. “निवडणुकीत पराभव झाला की ईव्हीएम वर आक्षेप घ्यायचे खोड आहे.” असे देखील त्यावेळी म्हणाले.
Raosaheb Danve | ‘यांच्या पाठिंब्याची गरज काय?’; दानवेंच्या वक्तव्यांनं चर्चांना पूर्णविराम
दानवेंचे विरोधकांना खुले आव्हान
जेव्हा हिमाचल प्रदेश मध्ये आम्ही निवडणुका हरलो. तेव्हा ईव्हीएम वर आक्षेप का घेतला नाही? असे म्हणत, दानवे यांनी “ईव्हीएम हॅक करणे शक्य नाही जर कोणी असा दावा करत असेल तर एखादा तज्ञ इंजिनीयर आणून ते हॅक करून दाखवावे.” असे खुले आव्हान दिले आहे. यावेळी बोलताना त्यांनी, राज्यात सुरू असलेली सत्ता स्थापनेची लगबग, मुख्यमंत्री पदाच्या घोषणेसाठी होणारा विलंब, महायुतीच्या घटक पक्षांमध्ये महत्त्वाच्या खात्यांसंदर्भात केले जाणारे दावे. या मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केले.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
जेव्हा तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येते, तेव्हा समन्वयाने काम करावे लागते. युतीतील तिनही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नसून महायुतीचे नेते दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा करून मुख्यमंत्री निवडतील. त्याकरिता वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे विलंब होतोय. कुठे काही नाराजी आहे. अशा चर्चांना काही अर्थ नाही. महायुती सरकारचा नवा मुख्यमंत्री कधी जाहीर होईल? शपथविधी कधी होणार? यासंदर्भात प्रक्षश्रेष्ठीकडून अद्याप आम्हाला कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. परंतु याचा अर्थ आमच्यामध्ये रस्सीखेच किंवा वाद आहेत. असे नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याच्या राजकारणात भूकंप ? ; बड्या नेत्यांचे तसे संकेत ,चर्चांना उधाण
विरोधकांवर साधला निशाणा
तसेच ईव्हीएम विरोधात ज्येष्ठ नेते बाबा आढाव आंदोलन करत असून याविषयी विचारले असता, “आम्ही त्यांचा आदर करतो” असे म्हणत त्यांनी प्रश्नाला दुजोरा दिला. तसेच “हिमाचल प्रदेशात आम्ही निवडणूक हरलो. तेव्हा कोणी ईव्हीएम वर आक्षेप घेतला नव्हता. आम्ही हरलो होतो तर जनतेचा कौल म्हणून आम्ही तो स्वीकारला होता. ईव्हीएमला कोणताही आक्षेप, दोष दिला नाही.” असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम