Ajit Pawar | ‘काँग्रेसने ईव्हीएममुळे पराभव झाल्याचे सिद्ध करावे’; अजित पवारांचे खुले आव्हान!

0
20
#image_title

Ajit Pawar | ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करत ‘आत्मक्लेश आंदोलन’ पुकारले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी अजित पवारांनी देखील बाबा आढावांची भेट घेतली असून या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार!; दिल्लीत अजित पवारांची मोठी घोषणा

“हे सरकार कोणालाही जुमानत नाही” – बाबा आढाव
“विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवली गेली. त्यावरून माझ्यासारख्या सुजाण नागरिकाला हे पटत नाही. तुम्ही पवार आहात. तुम्हाला काय बोलणार. तुम्हाला सगळंच माहिती आहे.” असे बाबा आढाव यांनी यावेळी म्हटले. तसेच, ईव्हीएम मधील गैरप्रकार सिद्ध करण्याचे काम आपले आहे. घटनेला 75 वर्षे होत आहेत. महात्मा फुलेंचा स्मृतिदिना दिवशी मी आत्मकलेश सुरू केला आहे. हे सरकार कोणालाही जुमानत नाही. मतपेटीत जे झालं त्याचा छडा लागला पाहिजे. याचे निराकरण झालंच पाहिजे. हे प्रकरण दाबायचा प्रयत्न झाला, तर आम्ही माघार घेणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील. पण मागे हटणार नाही.” असा इशाराही यावेळी बाबा आढाव यांनी दिला आहे.

Ajit Pawar | ‘उद्याच्या चर्चेत अंतिम निर्णय होतील’; दिल्लीतील बैठकीबाबत अजित पवारांनी सगळंच सांगितलं

“कर्नाटकात काँग्रेसने फुकट योजना दिली नाही का?”

दरम्यान, “लोकसभेचा कल वेगळा होता. त्यावेळेस ईव्हीएम वर आक्षेप घेतला नाही. यावेळी जनतेने मतदान केले आहे. त्याला कोण काय बोलणार, 1999 चे उदाहरण आहे. मतदारांनी लोकसभेला वाजपेयी यांना मतदान केले आणि राज्यात आम्हाला केले. काँग्रेसचे लोक म्हणतात, ईव्हीएममुळे पराभव झाला. पण त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. नाना पटोले यांनी संध्याकाळी मतदान कसे वाढले? असा सवाल उपस्थित केला. यात आमचा काय दोष आहे? लोकांनी कधी मतदान करावे, हा त्यांचा अधिकार आहे.” असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, कर्नाटकात काँग्रेसने फुकट योजना दिली नाही का? ‘आप’ने पंजाबमध्ये दिली नाही का? लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारने काय द्यावे हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याकडे देखील संजय गांधी सारख्या योजना सुरू आहेतच.” असे म्हणत निवडणुकीत पैशांचा वापर झाला या विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here